क्लोरिवॅट रसायनांचे वाटप
मुरूड - अमूलकुमार जैन
मुरूड ताल्युक्यातील बोर्ली ग्रुप ग्राम पंचायत हद्दीतील नागरिकांना पाणी शुद्ध पिता यावे यासाठी क्लोरिवॅट रसायनांचे वाटप बोर्लीचे प्रभारी ग्राम विकास अधिकारी अविनाश पिंपळकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत सभागृहात वाटप करण्यात आले.
मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्राम पंचायत हद्दीतील नागरिकांना पिण्यासाठी फणसाड धरणातून पाणी पुरवठा होत आहे. मात्र हे पाणी अशुद्ध असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही .या अशुद्ध पाणी पुरवठ्याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती चे जिल्हाकार्यकारिणी सदस्य तथा अमूलकुमार भलगट यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना फणसाड धरणातून येणाऱ्या अशुद्ध पाण्याच्या बाटली सहित निवेदन दिले होते.
मात्र भलगट यांनी बोर्ली ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याची दखल बोर्ली ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी अविनाश पिंपळकर यांनी घेऊन बोर्ली ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे,यासाठी तातडीने पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिवॅट रसायनांची खरेदी करून त्याचे वाटप प्रत्येक कुटूंबाना केले आहे.

Post a Comment