म्हसळा नगर पंचायत विरोधात कॉग्रेस पक्षाचा एल्गार , भव्य मोर्चा काढणार
माजी आमदार माणिक जगताप , मधुकर ठाकूर राहणार उपस्थितीत
म्हसळा : सुशील यादव
म्हसळा नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारा बाबत कॉग्रेस पक्षाकडून बुधवार दि . २ मे २०१८ रोजी सकाळी ११ वा. भव्य मोर्चा काढणार असल्याच म्हसळा तालुका अध्यक्ष डॉ.मुईज शेख यांनी एका प्रसिद्धी प्रत्रका मार्फत सांगितले आहे. या मोर्चासाठी माजी आमदार माणिक जगताप , मधुकर ठाकूर यांच्या समवेत मुश्ताक अंतुले, आर.सी. घरत , रायगड जिल्हा महीला अध्यक्षा अॅड . श्रद्रधा ठाकूर यांच्या सारखे जिल्हा कॉंग्रेसचे दिग्गज उपस्थित राहणार आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की म्हसळा नगर पंचायतीने शहरातील नागरिकांना हव्या असणाऱ्या नागरी सुविधा वेळेत पुरवत नसल्याने त्या संदर्भात म्हसळा तालुका कॉग्रेस कमिटीकडून दि . १९ एप्रिल रोजी म्हसळा नगराध्यक्षाना निवेदन देण्यात आले होते यामध्ये म्हसळा शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा योग्य व वेळेवर देण्यात यावा, नवानगर व ईदगाह परिसरातील पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, शहरातील गटारे स्वच्छ करण्यासाठी नगरपंचायतीने लवकरात लवकर पुढाकार घेणे, ईदगाह परिसरात स्ट्रीट लाईट ची व्यवस्था करणे, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, पाणी पट्टी व घरपट्टी कमी करून नागरिकांवरील आर्थिक बोजा कमी करणे तसेच पाभरे पाणी पुरवठा योजनेचे दोन वेळा भूमीपूजन होऊनही शहरवासिय पाण्यावाचून वंचित आहेत अशा एक ना अनेक नागरी सुविधांची म्हसळा शहरात वाानवा आहे असा उल्लेख केला होता तसेच मुख्याधिकारी रजेवर गेल्यामुळे नगरपंचायतीच्या कारभारात दिंरगाई निर्माण झाली आहे असे निवेदन देऊन नागरी सुविधा पुरविण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी दिला होता या दिलेल्या कालावधी मध्ये यापैकी एकही मागणी पुर्ण केली नसल्याने व नागरिकांना हव्या असणाऱ्या नागरी सुविधा न पुरविल्याने हा मोर्चा काढण्यात येणार आहे असे डॉ . मोइज शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या मोर्चा साठी तालुका अध्यक्ष डॉ.मुइज शेख , तालुका युवक अध्यक्ष अकमल कादिरी यांच्याासहीत शहरातील संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलीच कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे

Post a Comment