म्हसळ्यात बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुका रणरणत्या उन्हात राजकीय रणधुमाळी ; वातावरण अधिक तापणार
म्हसळा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे . या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला मंगळवार दि रोजी . ७ मे अर्ज दाखल करण्यापासून सुरुवात होणार आहे . या रणधुमाळीत सर्वत्र तुल्यबळ उमेदवारांत चुरशीच्या लढती रंगणार असून मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात वातावरण अधिकच तापणार आहे .
बहुतांशी गावात राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना असा सामना होणार आहे तर भाजप कोणाजवळ युती , काँग्रेस करणार की स्वबळावर लढणार , हेही बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे परंतु काही ठिकाणी मात्र आघाड्यांचे राजकारण रंगणार आहे. निवडणुका ज्या गावात आहेत त्या गावांमध्ये राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत . वरवटणे , आडी , नेवरूळ , घूम , ठाकरोली , कोळवट , जांभूळ , चिरगाव , कुडगाव , साळविंडे , चिखलप , पांगळोली या बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत बारा ग्रामपंचायतींपैकी सध्या पाच ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आहेत तर सात ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता आहे . त्यामुळे या ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधार्यांच्या तर सत्ता खेचण्यासाठी विरोधकांच्या जोर - बैठका सुरू झाल्या आहेत . या निवडणूक निकालाचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटतात . त्यामुळे ग्रामपंचायतींची सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे व नुकतेच श्रीवर्धन मतदार संघात शिवसेनेकडून उमेदवारीचा हिरवा सिग्नल मिळालेले माणगाव तालुका प्रमुख अनिल नवगणे , दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख रवि मुंढे , भाजप उपजिल्हा अध्यक्ष कृष्णा कोबनाक या मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या निवडणूक कार्यक्रमानुसार ७ मे पासून १२ मे पर्यंत नामनिर्देश अर्ज दाखल करण्याची मुदत आहे . १४ मे अर्ज छाननी व १६ मे दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेणे , त्याच दिवशी दुपारी ३ नंतर चिन्ह वाटप व रविवार २७ मे रोजी मतदान व २८ मे रोजी मतमोजणी होणार आहे..

Post a Comment