म्हसळा आरोग्यकेंद्रातील महिला डॉक्टरच्या हट्टापणामुळे एका महिलेचा मृत्यू: संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी....
म्हसळा : निकेश कोकचा
रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा या बोध वाक्याला अपवादात्मक वागणूक देत म्हसळा शहरातील ग्रामीण रुग्णालयात बेकायदेशीर पणे असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका महिला डॉक्टरच्या हट्टापणामुळे रुग्ण महिलेला आपला जीव गमवावा लागला असल्याची घटना घडली आहे.डॉक्टराच्या एका हट्टापणामुळे एखाद्या रुग्णाला आपला जीव गमवावा लागू शकतो ह्या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसत नाही नसून संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुढे येऊ लागली आले.३१ मार्च रोजी १०८ रुग्णवाहिकेला दुपारच्या वेळेस श्रीवर्धन येथून एका रुग्णाचा आयडी जनरेट झाला.श्रीवर्धन येथील आयडी जनरेट होण्याच्या १० मिनिटांनंतर म्हसळा येथील रुग्णाच्या नावाने १०८ साठी नवीन आयडी जनरेट झाले.मात्र जो पहिला येतो त्याला पहिला मान या दृष्टीकोनातून म्हसळा ग्रामीण रुग्णालयाबाहेर उभी असलेली रुग्णवाहिका श्रीवर्धन करिता निघणार तेवढ्यातच या रुग्णालयात चालू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका महिला डॉक्टरने त्यांना थांबून घेतले.इथे एक मुलगा गंभीर जखमी आहे तुम्ही त्याला माणगावला घेऊन जा असे सांगितले.यानंतर त्या १०८ च्या पायलेट आणि डॉक्टरांनी आम्हाला एक हृदय विकाराचा कॉल आला आहे आम्ही श्रीवर्धन येथून त्याला घेऊन सोबत म्हसळा येथील रुग्ण घेऊन जातो असे सांगितले.मात्र नव्यानी शिकाऊ आलेली ही महिला डॉक्टर आपल्या हट्टपणावर कायम राहुली असून तीने १०८ रुग्णवाहिकेला श्रीवर्धनचा कॉल लागला असताना देखील एक तास वेठीस धरले.यानंतर १०८ च्या डॉक्टरांनी कॉलसेंटरमध्ये विचारले असता त्यांनी देखील फर्स्ट इन फर्स्ट आउट या नियमानुसार श्रीवर्धनच्या रुग्णाला सेवा देण्यास सांगितले.कॉलसेन्टरच्या म्हणण्यानुसार १०८ रुग्णवाहिका श्रीवर्धन वरून रुग्णाला माणगाव येथे घेऊन जाताना त्या रुग्ण महिलेचा मोर्बाघाटामध्ये जीव गेला.म्हसळा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये नव्याने आलेल्या शिकाऊ डॉक्टरांनी हा हट्टपणा बाळगला नसता तर त्या महिलेचा जीव नक्कीच योग्यवेळी दुसऱ्या दवाखान्यात उपचार करून वाचला असता.
_______________________________________________
म्हसळा प्राथमिक आरोग्याकेंद्रामध्ये नव्याने आलेली शिकाऊ महिला डॉक्टरने ज्या रुग्णासाठी हट्ट केला होता त्याला पुढील उपचाराकरिता नेह्ण्यासाठी तळा येथील १०८ रुग्णवाहिकेचा कॉल लागला होता.मात्र तीने तो कॉल धुडकावून लावत अति गंभीर असणाऱ्या त्या रुग्णाला घरी जाण्याची परवानगी दिली.गाडीने धक्का दिल्याने फक्त खरचटलेला तो रुग्ण आता मात्र कोण्याही उपचाराविना ठणठणीत आहे.
_______________________________________________
म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने आलेल्या डॉक्टरांना मराठी येत नसल्याने ग्रामीण ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब रुग्णाचे मोठे हाल होत आहेत.डॉक्टर शिकाऊ असल्याने या रुग्णांना ते थेट उपचार करण्याआधी माणगाव किवा अलिबाग न्ह्या असे देखील सांगत आहेत.यामुळे गरीब रुग्णाच्या मानसिकतेवर परिणाम पडत असून तालुक्यातील बहुतांश रुग्ण हा खासगी डॉक्टरांकडे वळाला आहे.
_______________________________________________
आजी शुक्रवार दिनांक ६ एप्रिल रोजी जिल्हापरिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील गटविकास अधिकारी आणि सर्व डॉक्टरांची तातडीने सभा आयोजित केली असून या सभे मध्ये अश्या हलगर्ज डॉक्टरांवर काय कारवाई केली जाते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment