म्हसळा पंचायत समितीमध्ये ज्योतिबा फुलेंची जयंती उत्साहात साजरी
म्हसळा :प्रतिनिधी
संपूर्ण भारतभर शिक्षणाची गंगा चालू करणारे पहिले शिक्षक क्रांतिसूर्य
महात्मा ज्योतिबा फुले यांची १८९ वी जयंती म्हसळा येथील पंचायत समिती येथे
साजरी करण्यात आली. यावेळी म्हसळा तालुका पंचायत समिती सभापती उज्वला
सावंत,उपसभापती मधुकर गायकर, गटविकास अधिकारी श्री वाय एम प्रभे ,विस्तार
अधिकारी डी. एन. दिघीकर,माजी शिवसेना तालुकाप्रमुख समीर बनकर, पं. स.सदस्य
संदीप चाचलें, एन एल विचारे, त्याचबरोबर
ग्रामपंचायत व इतर कर्मचारी व पदाधिकारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या समस्यांचा विचार करत ज्योतिबा फुले यांनी अनेक ठिकाणी शाळा
सुरु करत अनेक नागरिकांना तसेच मुला मुलींना शिक्षणाचे धडे दिले. त्यामुळे
असंख्य कुटुंबे हि शिक्षणातून सावरू लागली.महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास
प्रोत्साहन देत त्यांनी महाराष्ट्रात पहिली स्त्रियांची शाळा १८४८ साली
पुणे येथे भिडेंच्या वाड्यात सुरु करत अनेक स्त्रियांना शिक्षणास रुजू
केले.त्यानंतर त्यांनी शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी
ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली ,समाज सुधारण्याच्या कार्याला गती
देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी सत्यशोधक समाजाची
स्थापना केलंइ.कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य
व जातीभेद हि निर्मिती मानवाचीच आहे असा खडा सवाल त्यांनी त्यावेळी
उपस्थित केला.नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे हा विचार मांडणारे ज्योतिराव
एक तत्त्वचिंतक व्यक्ती म्हणूनही आज ओळखले जातात

Post a Comment