श्रीवर्धन आगारात 'ती'ची कुचंबनाच ; इमारत दुरुस्तीसाठी लाखो खर्च तरीही शौचालय नाही....
श्रीवर्धन : श्रीकांत शेलार
श्रीवर्धन एसटी आगारात बांधकामाच्या नावाखाली शौचालय च उपलब्ध नसल्याचे समोर आले विशेष म्हणजे गेली कित्येक वर्षे महिलांची शौचालय अभावी कुचंबना होत असल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केली.
श्रीवर्धन आगरातून सकाळी पावणे चार ची पहिली बस निघते. पहाटेपासूनच मुंबई व इतर परिसरात जाणाऱ्या प्रवाशांची रेलचेल सुरू असते. मात्र येथील परिसरात पुरेशी लाईट व्यवस्था ही नसते. इथे स्वच्छतागृह कुठे असा प्रश्न आहेच. या स्थानकाची हि अवस्था नेहमीचीच आहे इथे कधी गाड्या वेळेवर नसतात आणि असल्या कि कधी वाहक नसतो किंवा चालक नसतो आणि त्यात भर म्हणून कि काय आऊन्समेंट यंत्रणा कायमची बंद असते तर आगरप्रमुख रेश्मा गाडेकर सांगतात की, बांधकाम सुरू असल्याने तारा तुटल्यात पण ही यंत्रणा च सुरू नसल्याची माहिती प्रवाशांनी दिली.
पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती, अर्धवट तुटलेली दारे, जागोजागी पडलेला कचरा आणि जीवघेणी दुर्गंधी यांमुळे अनेक महिला माघारी फिरतात. त्यातच लहान मुलांसाठी कोणतीही सुविधा असल्याने आईचे बोट धरून शौचास न्यायचे कुठे असा प्रश्न पालकांना पडतो. ज्येष्ठ नागरिक, बालक व महिला अथवा दिव्यांग यांना तर मोठे दिव्य पार करावे लागते.
बांधकाम ठप्प -
श्रीवर्धन आगाराच्या इमारत नुतनीकरण साठी 60 लाखांचे काम केले जात आहे. मात्र गेले सहा महिन्यांपासून सुरू असलेले काम अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे काम पावसाळी पूर्वी पूर्ण होणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे.
.............................................................................................
आगार व्यवस्थापक म्हणतात..
- श्रीवर्धन आगारात शौचालय सारख्या अत्यावश्यक गरजा नसल्याबत आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांना विचारले असता सांगितले की, कंत्राटदाराची कामाची मुदत संपुन गेली आहे आणखी एक महिना वाढवून दिली आहे. शौचालयाचे काम महिनाभरात पूर्ण होईल.
.............................................................................................
पर्यटकांच्या दृष्टीने महत्वाचे आगार असलेल्या श्रीवर्धन आगारात शौचालय नसणे हे दुर्दैव. त्यातच महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सची सोय, कचऱ्याच्या बंदपेट्या, हात धुण्यासाठी स्वच्छ स्थितीतील बेसिन या अपेक्षा दूरच. निसर्गरम्य ठिकाण म्हणून श्रीवर्धन ची ओळख आहे. सुरक्षित प्रवास म्हणून एसटी पचा पर्याय निवडतो. पर्यटकांच्या सोयी साठी आणखी प्रयत्न हवेत.- अंजली राऊत, महिला पर्यटक.

Post a Comment