श्रीवर्धन येथे उन्नाव व कठुआ घटनेचा निषेध; कठोर कारवाईची भारिप बहुजन महासंघाची मागणी.
श्रीवर्धन : श्रीकांत शेलार
देशभरात ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ चा नारा दिला जात असताना देशाच्या विविध भागात मुलींवर अत्याचार केला जात आहे. वाढत्या घटनेमुळे समाजमन सुन्न होत आहे. उन्नाव (जम्मू काश्मीर) व कठुआ (उत्तर प्रदेश) सारख्या घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या श्रीवर्धन शाखेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.
श्रीवर्धन येथील भारिप बहुजन महासंघ तसेच श्रीवर्धन भारतीय बौद्ध महासभेचे च्या वतीने कठुआ, उन्नाव, सुरत, येथे काळीमा फासणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र निषेध नोंदवला. या घटनेचा निषेध देशभरात केला जात आहे. वारंवार होणाऱ्या घटनेवर प्रतिबंधात्मक उपाय योजना केंद्र सरकारने करावी. पुन्हा निर्भयाचा समाज कंटकाकडून बळी जावू नये, यासाठी श्रीवर्धन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले व आरोपींना अटक करून कठोर कारवाईची मागणी केली.
यावेळी श्रीवर्धन येथील भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आयु.अशोक ल.पवार, सरचिटणीस प्रसाद चाफे, प्रवक्ता शांताराम चाफे, आनंद कूरवटकर, दशरत लोखंडे, बबन चाफे, अरुणाताई येलवे, शालिनिताई चाफे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment