बोर्ली समुद्र किनाऱ्यालगत बंधारा बांधण्याची मागणी...
बोर्ली येथील कोळी महिलांच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन
मुरुड जंजिरा:-अमूलकुमार जैन
मुरूड तालुक्यातील बोर्ली समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या घरांना समुद्राच्या लाटांपासून कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी बंधारा बांधून मिळावा अशी मागणी बोर्ली येथील कोळी समाजाच्या महिलांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुरुड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोर्लीच्या हद्दीतील मौजे बोर्ली कोळीवाडा बोर्ली येथे समुद्रालगत असणाऱ्या सुमारे अठावीस घरांचे सन 2017 च्या पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि समुद्राच्या लाटांच्या मोठ्या प्रवाहामुळे अठ्ठावीस घरांचे नुकसान झाले आहे. पावसाच्या अतिवृष्टी आणि समुद्राच्या लाटांच्या मोठ्या प्रवाहामुळे प्रचंड प्रमाणात घरांना आणि जीवितासही धोका निर्माण झाला.बोर्ली येथील समुद्रालगत असणाऱ्या गजानन रामदास नागोजी,नीरा जयवंत भगत,सचिन गजानन पिलाजी,दत्तात्रेय सहदेव वाडेकर, महेश वायरे,गणेश कट,चांगुणा दामोदर भोईर, यमुना नारायण नांदगावकर, लक्ष्मी चिंतामणी कोटकर, राधिका दामोदर नांदगावकर, निर्मला एकनाथ कोटकर, संतोष गणपत कट,सूर्यकांत सीताराम जावसेन,नारायण नथुराम हासपाटील,लीला पांडुरंग हासपाटील,हरिशचंद्र शंकर नागोजी,विजय विठोबा डोंबे, पोशीनाथ मकाजी,चंद्रकांत गजानन हासपाटील,नामय रघुनाथ मकाजी,भाग्यश्री नितेश भोईर,लक्ष्मण गजानन हासपाटील,गोरखनाथ नारायण भगत, प्रभाकर शिवराम पंढर,जयकृष्ण जगन भगत,सुशीला बाळकृष्ण भोईर,सुशीला काशिनाथ भोईर,सुविधा नामदेव राक्षीकर यांच्याघरांना समुद्रालगत संरक्षित बंधारा हा नसल्यामुळे समुद्राच्या अक्राळविक्राळ लाटांचा थेट मारा हा किनाऱ्यालगत असणाऱ्या कोळी बांधवांच्या घरावर बसत असल्याने आज त्यांच्या घराचे अतोनात नुकसान झालेले आहे. भविष्यात त्यांच्या घर उध्वस्त होऊन समुद्राच्या राजावर बेघर होण्याची वेळ येणार आहे.हि वेळ आमच्या समाज बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर येऊ नये बोर्ली येथील झालेल्या समाज बांधवांचे नुकसान हे पूर्णपणे मिळालेच पाहिजे,तसेच अद्यावत असणारा बंधारा हा महारष्ट्र सागरी मंडळ किना मस्त्यविभाग यांच्याकडे असलेल्या निधीतून लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न केले जाईल, भारताला परकीय चलन हे सागरातून मिळणाऱ्या मासळीतून मिळत आहे. बोर्ली मोरापाडा भागातील समुद्र किनाऱ्यापासून संरक्षित बंधारा बांधण्याचे केले मात्र ते काम अर्धवट केलेले आहे.ज्या ठिकाणी बंधारा बांधण्यात आला आहे त्या ठिकाणी समुद्राच्या लाटांचा मारा कमी प्रमाणात बसतो तर आमच्या ठिकाणी बंधारा नसल्याने लाटा बसण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात आहे.सदर ठिकाणी बंधारा न बांधल्यास घरांची हानी मोठया प्रमाणात होऊन वित्त आणि मानवी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी सदर ठिकाणी बंधारा पावसाळ्यापूर्वी बांधण्यात यावे अशी मागणी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन देतेवळी करण्यात आली आहे.
पालकमंत्री यांना निवेदन देतेवेळी कोळी समाजाच्या सुजाला भोईर,प्रगती राक्षिकार, माधुरी पंढरं, देवर्षी कट,विजया डोंबे आदी सहित असंख्य महिला उपस्थित होत्या.
कोळी समाजाच्या महिलांनी त्यांच्या घरांना समुद्राच्या लाटापासून संरक्षण व्हावे यासाठी निवेदन दिले आले,सदर ठिकाणी येत्या दोन चार दिवसांत संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाना पाहणी करण्याचे तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात येईल.:-रविंद्र चव्हाण. पालकमंत्री ,रायगड.

Post a Comment