राज़िप शाळा - ठाकरोली येथे डॉ . आंबेडकरांना अभिवादन
म्हसळा : प्रतिनिधी
न्यायासाठी संपूर्ण विश्वात प्रामाणिकपणे झगड़णारे महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची १२७वी जयंती म्हसळा तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . जयंतीनिमित्ताने डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची ढोलबाजांच्या गजरात शानदार मिरवणूक काढण्यात आली . म्हसळा तहसील कार्यालयात तहसीलदार रामदास झळके , नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षा कविता बोरकर , सभापती उज्ज्वला सावंत , यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन महामानवास अभिवादन केले . म्हसळा तालुक्यातील पाटी केंद्रातील रायगड जिल्हा परिषदेच्या पाटी , मांदाटणे , कुडगाव कोंड , पाणदरे , कोलबट , रातिवणे , भापट , सांगवड , ठाकरोली , देहेन , नर्सरी , मोरवणे , पी . एन . पी . माध्यमिक विद्यालय पाटी , जिजामाता माध्यमिक विद्यालय कोळबट या शाळांमध्ये महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . ठाकरोली शाळेत डॉ . बाबासाहेब यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली . मुख्याध्यापक जनार्दन पजई , धनेश अधिकारी , शरद कोदरे यांनी डॉ . बाबासाहेबांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन करताना त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले . याप्रसंगी व्यवस्थापन समिती सदस्य , विद्यार्थी उपस्थित होते .

Post a Comment