म्हसळ्यातील शेतकरी कृषी योजनांपासून वंचित...
भारत हा कृषीप्रधान देश आहे . मात्र याच कृषीप्रधान देशामध्ये अधिकारी व कर्मचान्यांच्या चूक व हलगर्जीपणामुळे म्हसळा तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांना मुकावे लागले आहे . म्हसळा तालुका पंचायत समिती कृषी विभागाकडे घरगुती सौरसंच , ताडपत्री अशा अनेक योजनांकरिता शेतकरीवर्गानेे कृषी अधिकारी भोगे व शिंदे यांनी सांगितलेल्या कागदपत्राप्रमाणे अर्ज दाखल केले ; परंतु कृषी अधिकारी यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार शेतकच्यांचे दिलेले अर्ज न स्वीकारता आपल्या मर्जीनुसार अर्ज स्वीकारून प्रस्ताव दाखल केले . दाखल केलेले प्रस्ताव हे म्हसळा तालुका पंचायत , समितीचे कृषी अधिकारी भोगे व शिंदे यांनी चुकीच्या स्वरुपात दाखल केले . तसेच जे प्रस्ताव दिले होते ते प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती म्हसळा यांच्या स्वाक्षरीशिवाय दाखल करण्यात आले होते . सध्या कॅशलेश पध्दतीत ऑनलाईन असा पारदर्शक कारभार असताना भोगे यांनी खरेदी पावती ही ऑफलाईन दाखल केली . सध्या शासनाच्या योजना या कॅशलेश पद्धतीने खरेदी निर्देश कृषी विक्री करण्याचे असताना तसेच म्हसळा कर्मचारी अधिकारी यांना संबंधीत योजनेचे प्रशिक्षण दिले असतानाही शेतकर्यांचे प्रस्ताव चुकीचे घेतले गेल्यामुळे तालुक्यातील शेतकरीवर्गाचे नुकसान झाले आहे . अशा या कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य कार्यवाही होण्यासाठी शेतकरीवर्गाने जिल्हा विकास अधिकारी वरपे , राजिप माजी कृषी सभापती पाटील यांना लेखी पत्र दिले आहे . याबाबत माजी कृषी सभापती डी . बी . पाटील यांच्याकडे संवाद साधला असता संबंधीत कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले .
ज्या अधिकान्यांनी शेतकरीवर्गाच्या योजनेसाठी अपुरे प्रस्ताव सादर केले , त्या अपुऱ्या प्रस्तावामुळे शेतकन्यांना विविध योजनांपासून मुकावे लागले आहे . याबाबत म्हसळा पंचायत समिती कृषी अधिकारी भोगे व शिंदे यांची यासंबंधी चौकशी करून कार्यवाही केली जाईल . श्री . वरपे . जिल्हा कृषी अधिकारी - रायगड

Post a Comment