सायगाव येथे 'स्वदेस' माध्यमातून पाणी योजना : शिवसेनेचे उपसभापती बाबुराव चोरगे यांच्या हस्ते भूमिपूजन..


सायगाव येथे 'स्वदेस' माध्यमातून पाणी योजना : शिवसेनेचे उपसभापती बाबुराव चोरगे यांच्या हस्ते भूमिपूजन..

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार
श्रीवर्धन तालुक्यातील सायगाव मराठा आळी येथे सोमवारी, ता. 9 रोजी पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन सोहळा नुकताच श्रीवर्धन पंचायत समिती उपसभापती बाबुराव चोरगे यांच्या हस्ते संपन्न झाला. तर या वेळेस रायगड जिल्ह्यातील नावाजलेल्या कार्यरत असलेल्या स्वदेस फाउंडेशन च्या मार्फत ही पाणी योजना राबविण्यात येत आहे.तर हया योजनेसाठी समाजसेवक काशिनाथ पवार यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांना मुंबईतील योगेश निगुडकर,शशिकांत सवतीरकर,संतोष सवतीरकर व सर्व ग्रामस्थांची साथ मिळाली. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी साडे चौदा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी मराठा आळीतील 45 कुटुंबाकडून प्रत्येकी चार हजार रुपयांची वर्गणी काढण्यात येणार आहे. उर्वरीत खर्च हा 'स्वदेस' फाउंडेशन करणार आहे. सायगाव मराठा आळीत एकूण 45 कुटुंब संख्येतुन 1 लाख एकक्तर हजार रुपये जमा होतील तर उर्वरीत रक्कम स्वदेश फाउंडेशन खर्च करणार आहे.भूमिपूजन प्रसंगी सरपंच लीलाधर रिकामे,सुधाकर निगुडकर,सचिन देऊळकर,दिनेश सवतीरकर,प्रकाश पालांडे,प्रवीण रटाटे,अशोक देऊळकर,व ग्रामस्थ तसेच महिला मंडळ व स्वदेस तालुका प्रमुख राजाराम माने, स्वदेस ग्राम अधिकारी अमोल त्रिभुवन, स्वदेस पाणी प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पाटील व महेश गोरेगावकर उपस्थित होते. पाणीपुरवठा योजना ही स्वदेस च्या आर्थिक व तांत्रिक सहकार्याने करण्यात येत आहे. सदर प्रकल्पाचे कामाचे देखरेख व गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी पाणी कमिटी ने काळजी पूर्वक लक्ष देने गरजेचे आहे. त्यासाठी सायगाव मराठा आळी येथील लोकांची पाणी कमिटी तयार केली आहे. ही पाणी कमिटी पाण्याचा प्रकल्प गुणवत्ता पूर्ण काम करणे व कायस्वरूपी शाश्वत ठेवण्यासाठी कार्यरत असेल.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा