श्रीवर्धनमध्ये रंगली अजब प्रेमाची गजब कहाणी...
श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धनमधील एक क्लास वन अधिकारी व एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता यांची अजब प्रेमाची गजब कहाणी दिवसेंदिवस रंगत असल्याचे दिसत आहे . या प्रेमापोटी प्रियकराच्या पदरात कंत्राटांचे दान पडत असल्याने इतर अनेक कंत्राटदारांमध्ये अस्वस्थताः पसर ली आहे , असा मेसेज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून याबाबतचे खरे - खोटे याबाबत कोणतीही खातरजमा नाही मात्र या मेसेजने श्रीवर्धनकरांचे चांगलेच मनोरंजन होत आहे ठेकेदारीच्या स्पर्धेतून हाणामारीचे प्रसंगही उद्भवल्याचे सांगितले जात आहे श्रीवर्धन मध्ये आपला हुद्दा सांभाळल्यापासून अत्यंत उत्तम काम करणारे अधिकारी म्हणून त्यांचे भरभरून कौतुक श्रीवर्धनमध्ये नागरिक करत होते याच क्लास वन अधिकार्याच्या या कारनाम्यानमुळे स्वतःच्या सोबत आपल्या पदाची देखील किंमत कमी करून घेतली आहे आणि आता श्रीवर्धनमध्ये प्रेमाचे गीत गाजायला लागल्यावर याच ऑफीसरने शरमेने आपल्या बदलीची मागणी देखील केल्याचे समजत आहे एका राजकीय पक्षाच्या कार्यकत्यांच्या प्रेमात पडून त्याच्या नावाने ऑफीसरने आपल्या पदाच्या सर्व मर्यादा ओलांडून अनेक शासकीय कामात अडथळे निर्माण केले आहेत . त्यामुळे याचा अनेकांना त्रास देखील झाला आहे मात्र स्वतःची कोणतीही क्षमता नसताना क्लास वन ऑफीसरला प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याच्याकडून विविध काम करून घेऊन अनेकांना त्रास देण्याचा व आपलं राजकीय व आर्थिक साध्य करण्याचा ठेकाच जणू या कार्यकर्त्यांनी घेतला आहे . कधी क्लास वन अधिकाऱ्याच्या वाहनाचा ड्रायव्हर म्हणून तर कधी अधिकार्याचा खासगी पी ए म्हणून हा कार्यकर्ता सर्व ठिकाणी या अधिकार्याच्या आजूबाजूला पाहावयास मिळतो . या प्रकरणाची चर्चा सर्वत्र रंग लागल्यापासून या कार्यकर्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहे . पण सद्यस्थिती तुझी माझं जमे ना आणि तुझ्या वाचून करमे ना अशी परिस्थिती या प्रेम कहाणीत पाहावयास मिळत आहे मात्र यामुळे चांगलेच सर्वांचे मनोरंजन होत आहे...

Post a Comment