श्रीवर्धन - म्हसळ्यात मोठ्या उत्साहात मेमन डे साजरा
महमद मेमन यांच्या हस्ते रुग्णालयात फळ वाटप
श्रीवर्धन : श्रीकांत शेलार
श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात 'मेमन डे' साजरा करण्यात आला. या निमित्ताने दोन्ही तालुक्यातील प्रमुख महमद मेमन यांच्या तर्फे रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. सन 11 एप्रिल 1971 रोजी मुंबई येथे ऑल इंडिया मेमन फेडरेशन गठीत करण्यात आली होती. त्या दिवसा निमित्ताने संपूर्ण भारतात मेमन डे सामाजिक कार्य करून साजरा करण्याचे मेमन फेडरेशनचे ऑल इंडियाचे अध्यक्ष इक्बाल मेमन (ऑफिसर)यांनी जाहिर केले होते. त्यानिमित्त बुधवार, दि. 11 रोजी श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील मेमन जमाततर्फे श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय, बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.
सामाजिक कार्याचा वसा घेतलेले आणि सदैव सहकार्याची भूमिका घेणारे अफजल मेमन यांनी मेमन डे निमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला बबनराव सुर्वे, शंकर गाणेकर यांसह अनेक मेमन समाजातील मान्यवर उपस्थित होते. यापुढे ही मेमन समजातर्फे सामाजिक सेवा करण्याचा उपक्रम राबविण्यात येईल असे श्रीवर्धन म्हसळा संघटनेचे अध्यक्ष महमद मेमन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Post a Comment