उंदीरमामा चावलेल्या रुग्णाला डॉक्टरांकडून पोलीस केस करण्याचा सल्ला:
शिकाऊ डॉक्टरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात...
म्हसळा : निकेश कोकचा
म्हसळा शहरात ग्रामीण रुग्णालयातील इमारतीला तब्बल पाच वर्षांनी शिकाऊ डॉक्टर भेटले असून त्यांच्या कारनाम्यांनी म्हसळा शहरात सध्या आरोग्या विभागाबाबत मस्करीचे वातावरण सुरु आहे.असाच एक प्रकार ३१ मार्च रोजी म्हसळा शहरात घडला असून ग्रामीण रुग्णालयात आलेले शिकाऊ डॉक्टरांने चक्क उंदीर चावलेल्या रुग्णाला पोलीस केस करण्याचा सल्ला दिला.
म्हसळा सोनार आळी येथील एका तरुणाला रात्रीच्या वेळेस उंदीरमामा चावल्याने त्यांनी दुसऱ्यादिवशी म्हणजे ३१ मार्च रोजी थेट म्हसळा ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथे त्यांनी उंदीर चावल्यानी विषबाधा होऊ नये म्हणून केसपेपर काढून रुग्णालयात आलेल्या शिकाऊ डॉक्टरसमोर हजर झाला.या डॉक्टरांनी त्याला गोळ्या लिहून दिल्यानंतर तुम्हाला पोलीस केस करायचे आहे का असे विचारले.डॉक्टरच्या या बेजबाबदार विचारल्याने प्रश्नामुळे सदर रुग्ण विचारात पडला असून आपण जर केस केली तर पोलीस नक्की पकडणार कोणाला? हा प्रश्न त्याच्या मनात आला.त्यामुळे हा रुग्ण घाबरला असून त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याला नकार दिला आणि घरी निघून गेला.उंदीरमामा चावल्यावर पोलीस केस करण्याच्या सल्ला देणारे म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील हे नवीन डॉक्टर आपल्या एक वर्षाच्या सराव बॉंन्ड मुळे नक्की स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हजर झाले आहेत की रुग्णाच्या जीवाशी खेळण्यासाठी हजर झालेत याची चर्चा सध्या म्हसळा शहरात सुरु झाली आहे.
म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील वैधाकीय अधिकारी या पदावर नव्याने रुजू झालेली आकांक्षा पॉल ही मूळ पश्चिम बंगालची आहे.तीला मराठी येत नसून ती ग्रामीण भागातून आलेल्या आदिवाशी व इतर समाजाच्या रुग्णांसोबत आरेरावीची भाषा वापरात असते.यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण रुग्णालयात मराठी बोलनारेच डॉक्टर नियुक्त करा अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
डॉक्टर शिकाऊ असल्याने उपचारही गूगलवर शोधतात....
म्हसळा ग्रामीण रुग्णालयात शिकाऊ आलेले डॉक्टर रुग्णाच्या जीवाशी खेळत असून गंभीरपणे प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णाचा उपचार हे डॉक्टर इन्टरनेटवर शोधत होते.ह्या प्रसूती मध्ये बाळ हा मृत झालेला असून त्याचा हात बाहेर आला होता.मात्र त्या महिलेला सुटका देण्यापेक्षा डॉ.पॉल यांना तिचा उपचार इंटरनेट वर कसा शोधता येईल या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले.शिकाऊ डॉक्टरांच्या या हलगर्जीपणा मुळे त्या महिलेचाही जीव गेला असता अशी तक्रार तिच्या नातेवाईकांनी दिली आहे.यामुळे म्हसळा सारख्या ग्रामीण रुग्णालयात मराठी येणारे व तालुक्याची परिस्थिती माहित असणारे डॉक्टर द्यावे ही बाब लवकरच मागणी देखील आता जोर पकडू लागली आहे.

Post a Comment