राष्ट्रवादी म्हसळा तालुकाध्यक्षपदी समीर बनकर यांची वर्णी लागणार...

राष्ट्रवादी म्हसळा तालुकाध्यक्षपदी समीर बनकर यांची वर्णी लागणार...

प्रतिनिधी,
म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारिणीत लवकरच खांदेपालट होणार आहे तालुका अध्यक्षपदावर समीर बनकर यांची वर्गे लागणार असून विद्यमान तालुकाध्यक्ष नाझीम हसवारे यांना बढती मिळणार असल्याचे समजते . शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत दाखल झालेले जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुभाष उर्फ बाळ करडे आणि समीर बनकर यांच्यावर तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे बनकर यांची ग्रामीण भागात पकड आहे मे २०१८ मध्ये होणाच्या १२ ग्राम पंचायत  निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळविण्यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे विद्यमान तालुका अध्यक्ष , पंचायत समितीचे  माजी सभापती नाझीम हसवारे यांना जिल्हयावर घेण्यात येणार असल्याचे सुतोवाच आ . सुनिल तटकरे यांनी केले आहे त्यामुळे येत्याकाळात बनकर तालुक्यात तर हसवारे जिल्हयात काम करतांना दिसणार आहेत . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा