श्रीवर्धन आगराच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रवाशांचे हाल आडी मार्गावर ४ किमी . पायपीट ; रस्त्याचे कारण सांगून एसटी फेरी केली बंद ; फेरी पूर्ववत न केल्यास आंदोलन छेडणार
श्रीवर्धन : प्रतिनिधी,
श्रीवर्धन आगाराच्या म्हसळा स्थानकातून सुटणाऱ्या आडी , साखरोणे या एसटीच्या फेऱ्या रस्त्याचे काम सुरु आहे असे सांगून अचानक आंबेत फाट्यापर्यंत सोडण्यात आल्या . त्यामुळे कोळे साखरोणे , आडी या गावातील प्रवाशांना त्याचा फटका बसला असून तेथील ग्रामस्थांना एसटी पकडण्यासाठी ४ किमी . पायपीट करावी लागत आहे . त्यामुळे आडी मार्गावरील एसटी बस पुन्हा पूर्ववत करा , अथवा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापनाला दिला आहे . आंबेत - बागमंडला या राज्य मार्गावरील रस्त्याचे सुंदीकरणाचे काम गेले कित्येक दिवस सुरु आहे . सध्या हे काम कोळे आणि तळवडेदरम्यान सुरु असून सकाळी १० नंतर रस्त्यावर खडी टाकून संध्याकाळी ५ पर्यंत त्याचावर बुरुमची माती टाकली जाते . आणि तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येतो . असे असतानाही या मार्गावर गाडी सोडण्यास आगार व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहेत . प्रवाशांनी याबाबत तक्रार केली असता संबंधित अधिकार्यांनी त्यांना उडवाउडबीची उत्तरे दिली . त्याच रस्त्यावर हरेश्वर - महाड ही एसटीची फेरी नियमित सुरु आहे . सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत असणाया एसटीच्या फेच्या आंबेत फाट्यापर्यंत सुरु ठेऊन संध्याकाळी येणारी वस्तीची गाडी आणि सकाळची ७ ची साखरोणे एसटी सुरु ठेवण्यात काय हरकत आहे असा संतप्त सवाल तेथील नागरिक करीत आहे . एसटी मंडळाचा वेळोवळी नफा व्हावा त्यासाठी विविध योजना राबवल्या जातात . पण अशा काही अधिकार्यामुळे एसटी . महामंडळ तोट्यात येत असल्याचे चित्र समोर येत आहेत . त्यामुळे आमची एसटी पूर्ववत सुरू ठेवा , नाहीतर आमच्या मार्गाने आम्ही आंदोलन , करू असा इशारा एसटी महामंडळाच्या अधिकारी वर्गाला सांगितले आहे .
आमच्या भागात एस. टी . शिवाय पर्याय नाही . सर्वसामान्य जनता ही ९० टक्के एसटीने प्रवास करतात . परंतु , एसटी महामंडळाच्या अनागोंधी कारभारामुळे आमच्या कोळे , साखरोणे , आडी या गावातील प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे . आजारी नागरिकांना उपचारासाठी घेऊन जाण्यास फार मोठी अडचण निर्माण होत आहे . अशा परिस्थितीत येत्या २ दिवसात या मार्गावर गाडी सुरु केली नाही , तर आम्ही पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंदोलन करू .
- अमोल पेंढारी , सरपंच , कोळे ग्रामपंचाय

Post a Comment