म्हसळा पंचायत समितीसमोरील क्रांती स्तंभ सुशोभिकरणापासुन वंचित : प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
म्हसळा : अरुण जंगम
म्हसळा येथील पंचायत समितीच़्या वास्तुच्या नुतणीकरणास 2015 मध्ये सुरवात झाली असुन जवळपास दोन कोटी रुपयांचे हे काम आंतीम टप्यात आले असल्याचे दिसत आहे.
हे काम चालु असताना या पंचायत समितीच्या समेरील स्वातंत्रसैनिक स्तंभ (क्रांती स्तंभ) मात्र विकासापासुन वंंचित राहीला असल्याचे तक्रार माजी सभापती महादेव पाटील यांनी विशेष कार्यकारी अधिकारी अलिबाग यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या निवेदनाद्वारे पाटील यांनी स्वातंत्र प्राप्तीच्या 25 वर्ष पुर्णत्वाने पंचा़त समितीच्या परिसरात क्रांतीस्भाची स्थापना करण़्यात आली होती आजमितीस या क्रांतीस्तंभाची पुर्णपणे दुरावस्था झाली आहे. एकीकडे पंचायत समितीच़्या नुतणिकरणाचे काम सुरु असुन हा क्रांतीस्तंभ मात्र विकासापासुन वंचीत राहीला असल्याचे नमुद केले आहे
वास्तविक पंचायत समितीच्या वास्तुचे नुतणिकरण करताना ह्या क्रांती स्तंभाचे देखील नुतणिकरण होणे गरजेचे असताना ईमारतीच्या नुतणीकरणाच्या कामामध्ये या स्वातंत्रसैनिक स्तंभाच्या नुतणीकरणाविषयी कोणतेही तरतुद केली नसल्याने ह्या क्रांती स्तंभांची दुरावस्था झाली आहे.
विशेष कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे या स्तंभाची ईमारतीच्या कामाबरोबरच नुतणीकरण करण्याची मागणी केली आहे
या स्वातंत्रसैनिक स्तंभाकरीता 2007-2008 मध्ये तीन लाख रु.ची तरतुद करुन सुशोभिकरणकरण्यात आले होते मात्र पंचायत समितीची जुनी वास्तु तोडताना या स्वातंत्रसैनिक स्तंभाच्या समोरील टाईल्स पुरणपणे उखडलेल्या असुन विटा देखील निघाल्या असल्याचे दिसत आहे तरी या कामासाठी जि.प.कडुन .5 लाख रुपयांची तरतुद करावी किंवा ईमारतीच्या कामातुन या स्तंभांचे नुतणिकरण करण्याची मागणी केली आहे
_-------------------------------------
"ईमारतीच्या नुतणिकरणाबरोबरच ह्या क्रांती स्तंभांचे सुशोभिकरण होणे गरजेचे असताना देखील हे क्रांतीस्तंभ दुर्लक्षित राहीले आहेत तरी भारतीय नागरिक म्हणुन यांचे नुतणीकरणासाठी निवेदन दिले आहे"
- माजी सभापती, महादेव पाटील
ईमारतीचे काम पुर्ण झाल्यावर या क्रांतिस्तंभाचे देखील सुशोभिकरण करणार आहोत या बाबतीत जि.प.अध्यक्षा यांचेकडे सदर बाबतीत पत्र व्यवहार केला आहे
-मधुकर गायकर, उपसभापती पंचायत समिती म्हसळा
-------------------------------------------------- ----
" पंचायत समितीच्या नविन वास्तु प्रमाणेच या क्रांतीस्तंभांचे देखील सुशोभिकरण करणार"
संदिप चाचले, पंचायत समिती सदस्य

Post a Comment