प्राथमिक शाळा कांदळवाडा शुभेच्छा समारंभ कार्यक्रम आयोजन .
म्हसळा - रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळवाडा शाळेत दिनांक १३ एप्रिल २०१८ रोजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोषजी पाखड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या वेळी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती चे पुजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आणि ईशस्तवन सादर केले. यावेळी व्यासपीठावर एस एम सी. अध्यक्ष श्री. संतोषजी पाखड साहेब, माजी अध्यक्ष दगडू पाडावे, शाळेचे मुख्याध्यापक शिवराम आडे सर, परदेशी सर, रहाटे सर, मनिषा शिर्के मॅडम, कमेटी सदस्य गजानन पाखड, सुस्मिता भुवड, प्रियंका बने, रश्मी तांबे, दिनेश गिजे, गणेश पाखड आदी मान्यवर व पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी अध्यक्ष दगडू पाडावे यांनी इयत्ता आठवी चे विद्यार्थी या शाळेतून परिक्षा देऊन आणि चांगल्या गुणांनी पास होऊन पुढील इयत्तेत जाणार आहेत त्यांनी भावी आयुष्यासाठी आणि शैक्षणिक प्रगती साठी खूप प्रयत्न करावे अश्या शुभेच्छा दिल्या. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोषजी पाखड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, चालू शैक्षणिक वर्षांत आपल्या कांदळवाडा शाळेनी खूप उपक्रमात आघाडी घेतलेली आहे. आणि या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग घेऊन शाळेचे नाव रोशन केले. विज्ञान प्रदर्शन, क्रिडा स्पर्धा, प्रश्न मंजुषा, स्कॉलरशिप परिक्षा, नवोदय परिक्षा, चित्रकला, वक्तृत्व, अशा स्पर्धा, उपक्रमात शाळा, केंद्र, तालुका स्तरावर कांदळवाडा शाळेचे नाव अग्रसर आहे त्याबद्दल विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक यांचे कौतुक केले. तसेच यावेळी ८ वी च्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेचे मुख्याध्यापक आडे सर व उपशिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी स्वतः मत निरोप समारंभ च्या वेळी व्यक्त केले गेल्या आठ वर्षांच्या कालावधीतील भावना व्यक्त करताना विद्यार्थी भारावून गेले. यावेळी इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट वस्तू दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग शिक्षक रहाटे सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन इयत्ता ७ वी चा विद्यार्थी कुमार विकि पाखड यांनी केले.

Post a Comment