म्हसळा शहरातील नागरी सुविधांच्या विविध समस्यां बाबतीत काँग्रेस चे नगरपंचायतीला निवेदन, मागण्यांची पूर्तता न केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा

म्हसळा शहरातील नागरी सुविधांच्या विविध समस्यां बाबतीत काँग्रेस चे नगरपंचायतीला निवेदन, मागण्यांची पूर्तता न केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा
म्हसळा : निकेश कोकचा
म्हसळा शहरातील नागरी सुविधांच्या विविध समस्यां बाबतीत काँग्रेस (आय.) ने काल (१९ एप्रिल) नगरपंचायतीला निवेदन दिले. यामध्ये म्हसळा शहरातील नागरिकांना वेळेवर व पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, नवाआनगर व इदगाह परिसरातील दूषित पाणीपुरवठ्या मुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, शहरातील गटारे स्वच्छतेबाबत नगरपंचायतीने लवकरच पावले उचलावीत, इदगाह परिसरात दिव्यांची व्यवस्था करणे, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करणे , पाणी पट्टी व घरपट्टी कमी करून नागरिकांवरील आर्थिक बोजा कमी करणे, तसेच मुख्याधिकारी रजेवर गेल्याने नगरपंचायतीच्या कारभारात दिरंगाई निर्माण झाली आहे यातून मार्ग काढणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोनदा भूमी पूजन होऊनही पाभरा धरण ते म्हसळा शहर पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करवून घ्यावे अशा अनेक नागरी सुविधांच्यां समस्यां बाबतीत काँग्रेस (आय.) कडून म्हसळा नगरपंचायतीला निवेदन देण्यात आले. व या सर्व मागण्यांची पूर्तता येत्या आठवडा भरात न केल्यास म्हसळा शहर काँग्रेस(आय.) च्या वतीने नगरपंचायतीच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सदर निवेदनात देण्यात आला. सदर निवेदन स्वीकारण्यासाठी नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने उपनगराध्यक्ष नसीर दळवी यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी कॉंग्रेस(आय.) चे म्हसळा तालुका अध्यक्ष डॉ. मोईज शेख , युवक काँग्रेस(आय.) तालुका अध्यक्ष अकमल कादिरी , युवक काँग्रेस(आय.) उप शहर अध्यक्ष नदीम दफेदार, मुझफ्फर हुर्झुक , शौकत घरटकर, शकील बावासाब, शगुफ्ता शेख, जफर हलदे, इब्राहीम कासार, खालिद कादिरी, अश्फाक बावासाब, व अनेक कॉंग्रेस (आय.) चे कार्यकर्ते उपस्तीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा