राष्ट्रवादीच्या पांगळोली उपसरपंचासह दोन सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश...
म्हसळा राष्ट्रवादीचे नेते अली कौचालींच्या पांगळोली गावात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे . राष्ट्रवादीच्या विद्यमान उपसरपंचासह दोन सदस्यांनी बुधवारी ( दि . ११ ) अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्या तथा काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हा अध्यक्षा अॅड . श्रद्धा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला . तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेले कौचाली यांच्या पांगळोली गावातच याच गावचे सुपुत्र काँग्रेसचे नवनिर्वाचीत तालुकाध्यक्ष डॉ . मुईज शेख यांनी राष्ट्रवादीला दे धक्का देत विद्यमान उपसरपंच सुरैया अ . सत्तार धनसे तसेच ग्रामपंचायत सदस्य नौशाद घनसे व शब्बीर घनसे यांना काँग्रेसमध्ये आणून येत्या मे महिन्यात येऊ घातलेल्या पांगळोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगूल वाजविले आहे तसेच तालुक्यातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या अनेक ग्रामपंचायतीतील सरपंच , उपसरपंच , सदस्य काँग्रेसकडे येण्यास उत्सुक असल्याचे डॉ . मुईज शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
, या काँग्रेस प्रवेशावेळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार , माण गाव तालुकाध्यक्ष विलास सुर्वे , महाड तालुकाध्यक्ष राजेंद्र कोरपे , रोहा तालुकाध्यक्ष मारूती दे वरे , श्रीवर्धन तालुकाध्यक्ष आझाद वतारे , पोलादपूर तालुकाध्यक्ष अजय सलागरे , अलिबाग तालुकाध्यक्ष यो गेश मगर , मुरूड तालुकाध्यक्ष सुभाष महाडीक , खोपोली तालुकाध्यक्ष मधुकर दळवी , पालीचे अनिरूद्ध कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते .

Post a Comment