म्हसळा तालुका मनसे ची मिटिंग संपन्न...

म्हसळा तालुका मनसे ची मिटिंग संपन्न...

काल दि. २५ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हसळा तालुका ची मिटिंग आयोजित करण्यात आली होती. आंबेत मध्ये मनसे श्रीवर्धन-म्हसळा संपर्क अध्यक्ष-शेखरदादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे म्हसळा तालुका अध्यक्ष-रविभाऊ पास्टे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या बैठकी मध्ये येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा विषय मांडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यात आले. सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन अनेक तरुणांनी मनसे मध्ये प्रवेश केला. 
श्रीवर्धन-म्हसळा तालुका संपर्क अध्यक्ष-शेखर दादा सावंत व म्हसळा तालुका अध्यक्ष - रविभाऊ पास्टे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी पक्ष प्रवेश केला.

प्रसंगी श्रीवर्धन-म्हसळा तालुका संपर्क अध्यक्ष शेखर दादा सावंत, म्हसळा तालुका अध्यक्ष-रविभाऊ पास्टे, म्हसळा तालुका सचिव -नितीन बंगाल ,म्हसळा उपतालुका  अध्यक्ष-विकास आंबेकर,म्हसळा उपतालुका सचिव-प्रवीण घरटकर, आंबेत विभाग सचिव -नितीन गोलाबंडे ,मेंदडी उपविभाग अध्यक्ष-राहुल नाक्ती,तसेच सोबत मुंबई श्रीवर्धन उपतालुका अध्यक्ष-सागर सावंत साहेब,आमशेत शाखा अध्यक्ष-चेतन बंगाल,कुडगाव शाखा अध्यक्ष-प्रमोद कुळे तसे पदाधिकारी अविनाश वाघरे, विजय वाघरे ,अभय पाडावे ,संजय जुजुम,आदी उपस्तिथ होते.

विद्यमान सरकार हे लोकांना फक्त आश्वासन देत आहे विकासाचा नाव नाही. येणाऱ्या निवडणुकीत  मनसे ही आपला उमेदवार निवडणुकी मध्ये उतरवणार आणि जनतेला एक नवीन सक्षम पर्याय  देण्याचा प्रयत्न करेल.
शेखर दादा सावंत, मनसे तालुका संपर्क अध्यक्ष 



आज आम्ही पक्षाच काम निष्टे ने करत आहोत आणि त्याच फळ नक्की मिळणार आणि जे सत्तेत असूनही जनते साठी काही करू शकत नाही त्यांना जनता योग्य वेळी  रस्ता दाखवेल आम्हाला विश्वास आहे. 
रविभाऊ पास्टे, मनसे म्हसळा तालुका अध्यक्ष

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा