दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिराचे कलशारोहण : धार्मिक कार्यक्रमाने मूळ गणेश मूर्तीचीही पुनर्स्थापना.

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिराचे कलशारोहण : धार्मिक कार्यक्रमाने मूळ गणेश मूर्तीचीही पुनर्स्थापना.

बोर्ली पंचतन : वार्ताहर
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध सुवर्ण गणेशमंदिराच्या नवीन वास्तूचे काम पुर्णत्वाकडे जात असताना नवीन मंदिरास नवीन कळस बसविण्याचा विधी संपन्न झाला तर सदर मंदिरामध्ये असणारी पुरातन मुळ गणपती मंदिराची मूर्तीवर वज्र्यलेप करून मूर्तीची पुनस्र्थापना देखील करण्यात आली . गणपती देव आणि पुजेची नेमणूक ट्रस्टच्या वतीने सदर कार्यक्रम करण्यात आला . तर पुढील कालावधीत सुवर्ण गणेशाचे सोने देखील शासनाकडून ट्रस्टच्या ताब्यात लवकरच प्राप्त होणार असून त्यानंतर सुवर्ण गणेशाचा मुखवटा तयार करून त्या मुखवट्याची देखील पुनस्र्थापना करण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर यांनी सांगितले . श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे १७ नोव्हेंबर १९९७ रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी द्रोपदीबाई धर्म पाटील यांच्या नारळ सुपारीच्या बागेमध्ये खोदकाम करीत असताना बावन्नकशी सोन्याचे सुमारे १ . ३२० किलोगॅम वजनाचा गणेश मुखवटा सापडला . यासोबत रत्नजडीत हिरे व इतर मौल्यवान वस्तूदेखील सापडल्या . तेव्हापासून रायगड जिल्हयातील दिवेआगर सुवर्ण गणेश पर्यटनाच्या संपूर्ण जगाच्या नकाशावर कोरले गेले . परंतु , त्यानंतर २४ मार्च २०१४ गुढीपाडव्याच्या रात्री याच सुवर्णगणेश मुखवटा असलेल्या गणेश मंदिरावर रक्त रंजित दरोडा पडला व  दरोडेखोरांनी सोन्याचा मुखवटा चोरून नेला . परंतु , पोलिसांच्या प्रयत्नाने सदर दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले व सदर १० दरोडेखोरांना जन्मठेप व कारावास अशा विविध शिक्षा न्यायालयाने दिल्या आहेत . सद्य स्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन निधीमधून सुवर्ण गणेश मंदिर बांधकामासाठी १ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असून मंदिराचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आल्याने जांभ्या दगडापासून बांधण्यात आलेल्या देखण्या मंदिरावर कळस बसविण्याचा तसेच गणेश मंदिरातीहााल मूळ पाषाणी गणेश मूर्ती वर वज़लेप व मूर्ती पुनस्र्थापना कार्यक्रम गणपती देव आणि पुजेची नेमणूक ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आला . मंदिरामध्ये ३ दिवस शांतीहोम उदक शांती , होमहवन , वास्तूशांती व जलविधास तसेच इतर धार्मिक कार्यक्रम सुरू होते तसेच गणेशाच्या सिंहासनाचे काम देखील करण्यात आल्याने मंदिराचा गाभारा अत्यंत सुशोभित दिसत आहे . सुवर्ण गणेशावर पडलेल्या दरोड्यांचा निकाल काही महिन्यांपूर्वी  लागला असून यामध्ये दोशी आरोपींना शिक्षा देखील न्यायालयाने सुनावली व दरोडेखोरांकडून हस्तगत असलेले सोने आता शासनाच्या ताब्यात असून सदर सोने येत्या काही कालावधीमध्ये गणपती देव आणि पुजेची नेमणूक ट्रस्टकडे मिळण्याची कार्यवाही अंतिम टप्यामध्ये असून नवीन मंदिरामध्ये सुवर्ण गणेश  मुखवट्यासाठी वेगळी स्ट्राँग रूम बनविण्यात आली असून यामध्ये लवकरच सुवर्णगणेश पुनस्र्थापित होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे . कार्यक्रम यशस्वीतेसाठी ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी , सदस्य , ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा