करोडो रुपये खर्च करूनही रायगड जिल्ह्यातील पाणी योजना अपूर्ण..

करोडो रुपये खर्च करूनही रायगड जिल्ह्यातील पाणी योजना अपूर्ण..

मुरूड जंजिरा : अमूलकुमार जैन

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात २०१७-१८या वर्षात २५९ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५१योजना ह्या अद्याप अपूर्ण आहेत. अपूर्ण असलेल्या योजनांपैकी३१योजनाच8कामे अजूनही सुरू झालेली नाही.त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा हा कोरडा राहणार आहे. या योजनेतील तिनविरा, रेवस,उमटे, खंडाळा,ममदापूर आदी योजनेवर करोडोचा निधी मंजूर असूनही  तसेच यातील काही देयके ठेकेदाराला देण्यात आलेली आहे.मात्र योजनेचा कळावधी उलटूनही ती अद्यापही अपूर्णावस्थेत आहे.

रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाणीटंचाई आहे.नागरिकांना सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील पाणी प्रश्न सुटावा म्हणून शासनाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत योजना कार्यन्वित केल्या आहेत.

ज्या योजना पूर्ण झाल्या आहेतं असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र त्यातील काही योजनांमधून पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.काही योजना ह्या कार्यान्वित करण्याचा कालावधी उलटून ही त्या अपूर्ण आहेत.

मात्र झालेल्या कामाचा निधी ठेकेदारास मिळाला आहे.त्यामुळे या योजना कधी पूर्ण होणार आहे.वलोकांना पाणी कधी मिळणार याबाबत अधिकारी मात्र उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणावरील जलशुद्धीकरण प्रकल्प,तिनविरा जलशुद्धीकरण प्रकल्प,रेवस ग्रामीण पाणी योजना,नेरळ येथील ममदापुर येथील पाणी योजना या प्रमुख पाणी योजनांची कामे अपूर्णावस्थेत आहेत.

नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प  योजना करण्यात आली असतानाही अजूनही या योजना कार्यान्वित झाल्या नसल्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.

जिल्ह्यात अपूर्ण असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी साठ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. याबाबत शासनाकडुन एक ते दोन कोटींचा निधी प्राप्त होत आहे.त्यामुळे योजना पूर्ण करण्यास निधीची कमतरता भासत असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी यांचे म्हणे आहे.

उमटे धरणावरील जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी तर तिनविरा धरणावरील अपुऱ्या कामाबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी आवाज उठविल्यानंतर काम सुरू करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे काम तालुकास्तरावर सुरू आहे.मात्र योजना सुरू होऊनही अनेक ठिकाणी त्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत. याबाबत अधिकारी वर्गाचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

रायगड जिल्ह्यातील२९५पेयजल योजना कार्यन्वित करण्यासाठी १५कोटी ९०लाख१५हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. यापैकी१३कोटी२३लाख३७हजार रुपयांचा निधी योजनांवर खर्च करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी अजूनही ६० कोटींची तरतूद करावी लागणार आहे.असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता वेंगुरेकर यांनी सांगितले आहे.
.....................................................................................

अदिती तटकरे.अध्यक्षा, रायगड जिल्हा परिषद.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील सुरू जिल्ह्यातील योजना ज्या प्रगतीपथावर आहेत.मार्च २०१८ पर्यन्त पूर्ण करण्याचा प्रयत्न आंबे.योजना काही कारणास्तव बंद असतील तर त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. निधीची कमतरता असून काम झालेल्या योजनेचे काम पाहून निधी वितरित करण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा