खरसई आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.
म्हसळा तालुक्यातील ८ गावांसाठी शासनाने एक ग्रामीण रुग्णालय , तीन प्राथमिक आरोग्य केंद्र , एक जिल्हा परिषद दवाखाना आणि ९ उपकेंद्र असे देऊनही आजमितीस शासनाकडून अपेक्षीत सेवा मिळत नसल्याच्या तालुक्यातून सातत्याने तक्रारी पुढे येत असतानाच , मुख्यमंत्री ग्रामीण परिवर्तन गाव म्हणून निवड झालेल्या खरसई गावात सुसज्ज असे बांधलेले उपकेंद्र गेले ६ वर्षे बंद स्थितीत आहे मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडूनही दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली जात आहे . खरसई उपकेंद्राच्या अधिपत्याखाली खरसईसह बनोटी , रेवळी , वरवठणे , पेढांबे , आगरवाडा तोंडसुरे ही सुमारे ६५०० लोकसंख्या असणारी गावे येत आहेत . केंद्र व राज्य शासनाने सर्वांसाठी आरोग्य हे अधिकृत धोरण बनवितानाच सुदृढ़ राष्ट्र ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागासाठी प्रचंड अर्थिक तरतूद देऊनही म्हसळा तालुक्यातील नागरिकांना शासनाकडून परीपूर्ण आरोग्य सेवा मिळत नसल्याचे पुढे येत आहे . म्हसळा तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामीण परिवर्तन गाव म्हणून निवडलेले खरसई गावातील उपकेंद्र व तेथून मिळणार्या दर्जेदार सेवांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह ग्रामप्रवर्तकांनी या सेवा - सुविधांकडे विशेष लक्ष देणे जरुरीचे आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सन २०११ ला बांधलेल्या उपकेंद्राच्या माध्यमातून तात्काळ आरोग्य सेवा सुरु व्हावी , अशी मागणी आहे.
जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून जनतेला सेवा - सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष असते तालुक्यातील बहुतांश उपकेंद्रातून आरोग्य सेवक - सेविका मुख्यालयांत राहतच नाही . परंतू उपकेंद्र बळकटीकरण व देखभालं दुरुस्तीचा येणारा वार्षिक निधी संपला जातो , त्याची चौकशी होणे आवश्यक आहे.
- महादेव पाटील , माजी सभापती , पंचायत समिती म्हसळा
खरसई उपकेंद्राची इमारत आहे स्थानिक ग्रामपंचायतीने अद्यापही पाणी पुरवठ्याची सोय केलेली नाही . पावसाळ्यात उपकेंद्रात जाण्यासाठी योग्य मार्ग नाही . उपकेंद्रासाठी आरोग्य सेविका , आरोग्यसेवक व मदतनीस अशी पदे असतात , ही पदे कार्यरत आहेत , जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडे मदतनीस भरतीसाठी सातत्याने मागणी केली जात आहे .
- डॉ . सुज तडवी , तालुका आरोग्य अधिकारी, म्हसळा

Post a Comment