विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धे पासून दूर रहा - गटशिक्षणाधिकारी साळुंखे साहेब

                      
म्हसळा -  दिनांक  १४ मार्च २०१८  रोजी  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा म्हसळा मार्फत  म्हसळा तालुक्यातील मराठी प्राथमिक शाळा मेंदडी व उर्दू शाळा मेंदडी येथे  जनजागृतीचे जादूचे प्रयोग सादरीकरण करण्यात आले.      या  प्रसंगी  म्हसळा तालुक्याचे  कर्तव्य दक्ष  पंचायत समिती म्हसळा शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे साहेब उपस्थित होते, रायगड जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती माजी प्रधान सचिव श्री  विजयकुमार सोनवणे सर,  तालुका कार्याध्यक्ष किशोर मोहिते सर विज्ञान जाणिवा प्रमुख संतोष जाधव,  तालुका सचिव  जयसिंग बेटकर सर  शाळेचे शिक्षक वृंद  शुभदा दातार मॅडम गितांजली भाटकर मॅडम प्रियंका गोसावी  आब्बास शेख शबाना जालगावकर मोहिते सर बेंबळगे सर विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.  या कार्यक्रमात  संतोषजी जाधव आणि सोनावणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली   जादूचे प्रयोग सादरीकरण करण्यात आले पाण्यावर दिवा पेटवणे,  नारळ पेटवणे,  कानातून दुध काढणे,  लिंबू कापून रक्त काढणे,  दोरी कापून जॉइंट करणे, सोन्याची अंगठी गायब करणे, आकाशातून चैन काढणे, हातातून पैसे काढणे , जिभेतून सळी काढणे, पेटते कापून खाणे, गरम कढईतून पैसे काढणे  इत्यादी प्रयोग सादरीकरण करून  विद्यार्थ्यांना या प्रयोग सादरीकरणातू वैज्ञानिक दृष्टिकोन जाणिव निर्माण करून दिले शालेय विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.  साळुंखे साहेब यांनी  सांगितले की  आजच्या एकविसाव्या शतकात आजचा विद्यार्थी हा चौकस वृत्तीचा आहे  त्यांनी प्रत्येक गोष्टीतील सत्यता मुळापर्यंत पहाणे खूप काळाची गरज आहे ,  आज समाजात तंत्रज्ञान विकसित झाले असले तरी लोक भोंद बाबा,  भगत,  मांत्रिक  यांच्या कडे जाणे पसंत करतात या अनिष्ट प्रथा रूढी परंपरा नष्ट झाल्या पाहिजेत यासाठी आजच्या शालेय विद्यार्थ्यांनी  जागृत राहणे गरजेचे आहे असे साळुंखे साहेब यांनी स्पष्ट केले  अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा म्हसळा या शाखे मार्फत शाखेचे सचिव बेटकर सर यांनी पार्श्वभूमी सांगितली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिते सर यांनी केले आभार प्रदर्शन शेख सर यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा