सुतारवाडी परिसरात पावसाची तुरळक सर : आंबा पिकाला मोठा फटका बसणार...
सुतारवाडी आणि आजुबाजूच्या पंचक्रोशीमध्ये शुक्रवारी ( दि . १६ ) १५ मिनिटे पावसाच्या तुरळक सरी पडल्या . गेल्या दोन दिवसांपासून सकाळपासून ढगाळ वातावरण आणि पावसाचे सावट होते . अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडांना कैच्या लागल्या आहेत . तर काही ठिकाणी अद्यापही झाडांना मोहोर आहे ज्या झाडांना मोहोर आहे त्या झाडांचा मोहोर या वातावरणामुळे गळून पडला आहे . सुतारवाडी , कुडली , सावरवाडी , धगडवाडी , येरळ , कामथ या परिसरात फार्महाऊस आहेत . या फार्महाऊसच्या परिसरात आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे दरवर्षी या परिसरात व्यापारी येवून आंबे खरेदी करतात . यावर्षी मात्र बदलत्या हवामानाने बागायतदार हवालदिल झाला आहे . काही परिसरात कलिंगडाची लागवड केलेली आहे या बदलत्या हवामानामुळे या पिकाला धोका संभवतो की काय ? अशी भिती व्यक्त केली जात आहे . प्रचंड प्रमाणावर उष्मा जाणवत असताना अचानकपणे हवामानात बदल होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .

Post a Comment