बोर्लीपंचतन मध्ये शहीद दिन साजरा...

बोर्लीपंचतन मध्ये शहीद दिन साजरा...
दिवेआगर : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे नागरी हक्क संवरक्षण संघाच्या वतीने काल( शुक्रवार ता . २३मार्च ) रोजी संघाचे पदाधिकायांच्या प्रमुख उपस्थितीत शहीद दिन साजरा करण्यात आला . भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हसत हसत फासावर गेलेल्या शहीद भगत सिंग , सूखदेव , राजगुरु यांची बोर्लीपंचतन येथे २३ मार्च रोजी ८७ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली शहीद भगत सिंग सुखदेव , राजगुरु यांना लाहोर जेल मध्ये फाशी देण्यात आल्याने आजचा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे यावेळी नागरी हक संवरक्षण संघाचे प्रमुख पदाधीकारी सुभाष कांबळे व जानवी मेरी यांनी उपस्थितां आपल्या मार्गदर्शनात सांगीतले . याप्रसंगी संघाच्या वतीने शहीद भगत सिंग राजगुरु सुखदेव या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून शहीद दिन साजरा करण्यात आला . नागरी हक्क संवरक्षण संघाचे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष ओमकार शेलार , सदस्य किरण भंडारी बंडया तोडलेकर शंकर गाणेकर , अमोल शिरवटकर , विजय तन्ना , चेतन परकर , सुरेश चंजेरी आदि उपस्थित होते . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा