श्रीवर्धन - बोरीवली शिवशाही लवकरच धावणार
दिघी : प्रतिनिधी
श्रीवर्धन आगारात गेल्या ६ फेब्रुवारीपासून श्रीवर्धन - भिवंडी व श्रीवर्धन - मुंबई अशा दोन बस सुरू केल्या . मात्र , या दोन्ही बस चा मार्ग श्रीवर्धन वरून म्हसळा असल्याने बोर्लीपंचतन , दिघी परिसरातील प्रवाशांनी नाराजी दर्शवली होती . प्रवाशांच्या मागणीनुसार या संबंधाचे वृत्त प्रसार माध्यमामध्ये प्रकाशित झाल्यानंतर वेळोवेळी मागणी होत असल्याने शिवशाही बोर्लीपंचतन मार्गे सुरु करण्यात आली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात आजूबाजूच्या तीस गावांचा एसटी प्रवास बोर्लीपंचतन बसस्थानकातून होतो . दिवेआगर हरिहरेश्वर , तसेच दिघी, जंजिरा अशी पर्यटन स्थळे असल्याने राज्यातील विविध भागांतील पर्यटकांना आता शिवशाही चा प्रवास हवाहवासा वाटतो . अशी मागणी सर्व स्तरांतून होत असल्याने याबाबत म्हसळा Live ने ही याकडे लक्ष वेधत शिवशाही बोर्लीपंचतन मार्गे हवी असे वृत्त दिले होते . अखेर या वृत्ताची दखल घेऊन श्रीवर्धन आगारात श्रीवर्धन - नालासोपारा शिवशाहीच्या दोन बस बोर्लीमार्गे सुरु करण्यात आल्या . खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गावर अत्याधुनिक अशा शिवशाही बस सुरू केल्या आहेत . पर्यटन ह्या महत्वाच्या असणान्या श्रीवर्धन तालुक्यातील आगाराला आता चार बस वाढवून दिल्या आहेत . वातानुकूलित बस , आकर्षक डिजिटल बोर्ड , पुशबँक आरामदायी सीट टू बाय टू आसनव्यवस्था , मोबाइल चार्जर , सीसीटीव्ही , अनाउन्समेन्ट सिस्टिम अशी या बसची वैशिट्ये असलेल्या या बसेस श्रीवर्धन - नालासोपारा असून बोलपंचतन येथून सकाळी ८ वाजता व दूसरी बस दुपारी २ वा . या दोन बस साई मोर्चामा नालासोपारा जातील परतीच्या प्रवासासाठी नालासोपाराहून सकाळी ५ : ३० ला व दूसरी बस रात्री १० वा . सोडण्यात येईल अशी माहिती श्रीवर्धन आगाराकडून देण्यात आली . श्रीवर्धन ते म्हसळा या मागनेि बस नेण्या ऐवजी ती बस बोलॅपंचतन मार्गे सुरू केल्यास अधिकच्या प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल . या मार्गावरील मुंबई कडे जाणाच्या प्रवाशांची संख्या मोठी आहे . दिवेआगर , दिघी पर्यटकांना सोईचे होईल . अनेक प्रवाशांनी शिवशाही बस बोर्लीपंचतन मार्गे सुरू करावी अशी मागणी केली होती . याबाबत श्रीवर्धन आगाराच्या व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांना विचारणा केले असता त्यांनी सांगितले की , या नवीन बस बोर्लीपंचतन मार्गे सुरू केल्या असून लवकरच श्रीवर्धन - बोरीवली शिवशाही बस बोर्ली मार्गे सुरू करण्याचा मानस आहे..

Post a Comment