दिघी - माणगाव महामार्गाचे काम सुरु ; मालकी पुरावा सिद्ध करण्यापूर्वीच रस्त्याच्या कामाला सुरुवात...
म्हसळा, प्रतिनिधी
माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्ग शासनाने मंजूर करून कामाला वेगाने सुरुवात देखील झाली झाली आहे या कामाचे ठेकेदार जे . एम . म्हात्रे कंपनी असून या महामार्गासाठी वापरण्यात येणारी जमिन आजही कोणाची आहे सिद्ध करण्यास ठेकेदारांना व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना यश आले नसल्याचे खात्रीलायक वृत्त हाताशी आले आहे . याविषयी सविस्तर वृत्त असे की , सध्या काम सुरू असलेला माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्ग हा रस्ता पुर्वी रा . जि . प . च्या ताब्यात होता . काही गावांमध्ये संपादन झाले . त्यावेळी असणाच्या R . O . W . ( रस्त्याची हद्द निश्चित करणारा ) कडून रस्त्याच्या संदीकरणाबाबत शासनाच्या नियमानुसार खेदी करण करण्यात आले . मात्र काही गावात संपादन झाले नसल्याने त्या त्या गावातील शेतकर्यांना मोबदला देण्यात आलेला नाही , किंवा यापुढे देणार की नाही याबाबत साधी माहितीही संबंधीत खात्याकडून दिली जात नाही . रस्त्याची वेडीवाकडी वळणे सरळ करण्यासाठी जे नवीन भूसंपादन करण्यात येणार आहे त्याबाबत ही संबंधीत खात्याने पुढील प्रक्रियेला सुरुवात न करताच कामास सुरूवात केली आहे . सुरले , बोर्ले या गावातील वन जमिनीवर बांधण्यात आलेल्या घरांचा प्रश्न कायम आहे व ते सध्या भीतीने जीवन जगत आहेत . त्या गावातील घरांचे काय होणार ? हा निर्णय अंधारातच आहे . सदर विभागाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे सर्व सामान्य हवालदिल शेतकरी मात्र झाले आहेत तर दुसरी बाजू पाहता जे . एम . म्हात्रे कंपनी म्हणजे बडा ठेकेदार असल्याने संबधीत प्रशासन दचकत दचकत आपले काम भितीपोटी करत असल्याची चर्चा पिडीत शेतकर्यांकडून ऐकाव्यास मिळत आहे अशा या बिनधोकपणे काम करणाच्या ठेकेदावर कारवाई करणार कोण ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आम्ही शासनाला वेळोवेळी मदत केली आहे आणि करणार आहोत ; पण जर का शासन अशा दुटप्पी राजकारणामुळे शेतकर्यांना फसवणार असेल तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने पुढील नियोजन करून योग्य तो धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही .
- सुजित दिनकर शिंदे पंचायत समिती सदस्य , माणगाव

Post a Comment