आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु...

आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु...

श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता . महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले मतदारसंघ अंतुले यांनी चार वेळा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले होते . त्यांनी त्यावेळी श्रीवर्धन मतदारसंघात कच्चे असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण अनेक ठिकाणी लघुपाटबंधारे योजना कार्यान्वित केल्या . त्यानंतर रवींद्र राऊत काँग्रेसचे आमदार झाले ते सुद्धा राज्यमंत्री होते . १९९५ सालच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हिंदुत्वाची लाट आली आणि राज्यात मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युतीची सत्ता स्थापन झाली . श्रीवर्धन मतदारसंघातून रवींद्र राऊत यांचा पराभव करुन शिवसेनेचे शाम सावंत आमदार झाले . आमदार शाम सावंत चार वेळा येथून निवडून आले त्यांच्या कार्यकाळात आमदार निधी मधून लहान मोठी विकासकामे करण्यात आली . नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड करुन काँग्रेस पक्षात गेल्यानंतर शाम सावंत यांनी सुद्धा राणे यांना समर्थन देत आमदारकीचा राजीनामा दिला . श्रीवर्धन मतदारसंघात पोटनिवडणुक झाली या वेळी शिवसेनेने श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक असलेले शेतकरी कुटुंबातील त्यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य असलेल्या तुकाराम सुर्वे यांना उमेदवारी दिली . त्यांनी शाम सावंत यांचा पराभव करुन संपूर्ण नारायण राणे यांच्या समर्थकांचा विजयी वारु श्रीवर्धन मध्ये रोखला . तुकाराम सुर्वे यांनी सुद्धा उपलब्ध आमदार निधीतून लहान मोठी विकासकामे केली .

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढउन मोठा विजय  संपादन केला होता . अगोदर पूर्वीचे जंजिरा संस्थान असलेला मतदारसंघ अस्तित्वात होता . श्रीवर्धन , म्हसळा , मुरुड व माणगाव तालुक्यातील गोरेगाव विभाग श्रीवर्धन मतदारसंघात होता . त्यानंतर राज्य शासनाने लोकसंख्येनुसार मतदारसंघाची पुनर्रचना केली . त्यामध्ये सुनील तटकरे यांचा रोहा - माणगाव विधानसभा मतदारसंघ नाहीसा झाला . नविन श्रीवर्धन मतदारसंघात श्रीवर्धन , म्हसळा तळा तीन तालुके संपूर्ण तर रोहा तालुक्यातील रोहा अष्टमी मंडळ व माणगाव तालुक्यातील माणगाव मंडळ परिसराचा समावेश करण्यात आला . यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचे सुनील तटकरे उमेदवार होते . तर शिवसेना भाजप युतीचे श्रीवर्धनचे तत्कालीन आमदार तुकाराम सुर्वे उमेदवार होते या निवडणुकीत काँग्रेस पक्षात असलेले गुलाम पेशमाम यांनी टीव्ही या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढविली होती . शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवार असलेल्या उमेदवारांच्या सारखेच नाव असलेले अपक्ष उमेदवार परस्परविरोधी उभे केले होते यावेळी सुनील तटकरे यांनी अत्यंत कल्पकतेने नियोजन करुन सेनेचे आजी  माजी पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आणण्यात यश मिळविले होते . त्या शिवसेना भाजप युती भक्कम असूनही व आघाडीच्या मतांचे विभाजन होऊन सुद्धा सुनील तटकरे यांनी मोठा विजय मिळविला होता . या निवडणुकीनंतर तटकरे यांना राज्याचे अर्थमंत्री पद मिळाले . आणि त्याच वेळी श्रीवर्धन मतदारसंघाची विकासाची खरी सुरुवात झाली . श्रीवर्धन शहरात शासकीय तंत्र निकेतन विद्यालयाच्या इमारतीचे काम झाले . याच इमारतीत एसएनडीटी महिला महाविद्यालय सुरु करण्यात आले . या महाविद्यालयासाठी बोडणी घाटाच्या वरती असलेल्या जागेत संपादन करुन भूमीपूजन करण्यात आले आहे केंद्रशासनाचा विशेष पर्यटन निधी वापरून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर कोठेही नाही असा सुशोभित धुप प्रतिबंधक बंधारा अंदाजे चौदा कोटी रुपये खर्चेन बांधण्यात आला आहे श्रीवर्धनच्या उपजिल्हा रुग्णालयाची इमारत , श्रीवर्धन नगरपरिषद नवीन इमारत , सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत आणण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय भवन , भुमीअभिलेख कार्यालय , म्हसळ्याचे ग्रामीण रुग्णालय मतदारसंघातील अनेक रस्ते नूतनीकरण करण्यात आले . त्यानंतर २०१४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच तटकरे यांनी आमदारकीचा राजीनामा देउन विधानपरिषदेवर जाणे पसंत केले . त्यांचे पुतणे अवधुत तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दीली . निवडणुकीत शिवसेना व भाजप युती न झाल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले . काँग्रेसची व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी न झाल्यामुळे हे दोन्ही पक्ष स्वातंत्र लढले . शिवसेनेकडून रवी मुंढे तर भाजप कडुन शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या कृष्णा कोबनाक यांनी भाजप मध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली . कॉग्रसने उदय कठे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसने अवधुत तटकरे यांना उमेदवारी दिली होती . इतर छोट्या पक्षातील उमेदवार व अपक्ष उमेदवार होतेच . या निवडणूकीत शिवसेनेच्या रवी मुंडे यांना फक्त ७० मतानी पराभव पत्करावा लागला होता . भाजपचे उमेदवार कृष्णा कोबनाक यांना जवळ जवळ साडेअकरा हजार मते मिळाली होती . या निवडणुकीत अवधूत तटकरे विजयी झाले होते . मात्र २०१९ साली होणार्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवार कोण अशी चर्चा सर्वत्र रंगलेली पहायला मिळते . भाजप सत्तेत असल्यामुळे मतदारसंघात सध्या भाजपचे पाय पसरले आहेत शिवसेनेचा उमेदवार स्वबळावर निवडून येणे जर तर ची गोष्ट आहे आत्ताच्या युतीतील कलगीतुरा पाहून आगामी निवडणूकीत युती होणे शक्य वाटत नाही . भाजप सुद्धा स्वबळावर चमत्कार घडवेल अशी स्थिती नाही . अवधुत तटकरे यांचा नसलेला जनसंपर्क त्यांची वर्णी लागेल असे चिन्ह नाही.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा