आज
दि.२१/०३/२०१८ रोजी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम
सभापती मा. आस्वाद पाटील (पप्पूशेठ) यांनी रायगड ज़िल्हा परिषदेचा "सन
२०१७-१८ चा अंतिम सुधारित व सन २०१८-१९ चा मूळ अर्थसंकल्प" सादर केला.
अर्थसंकल्प सादर करताना जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढीसाठी केलेले विशेष
प्रयत्न, आखलेल्या नवनवीन योजना स्पष्ठ निदर्शनास येत होत्या. या
अर्थसंकल्पास विरोधकांसह सर्वानी पाठींबा दर्शवून एकमताने अर्थसंकल्प मंजूर
केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय , अपंग,
महिला वर्ग यांच्या विकासासाठी भरघोस तरतूद करण्यात आली. या
अर्थसंकल्पामध्ये "पर्यटन विकासासाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी
नावीन्यपूर्ण योजना" म्हणून विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्याच बरोबर
शिक्षण , आरोग्य , कृषी या विभागानी सुद्धा "नावीन्यपूर्ण योजना"
अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट केल्या आहेत.
Post a Comment