जागतिक महिला दिनानिमित्त म्हसळ्यात अंगणवाडी सेविकांचा सन्मान...

 म्हसळा   -   म्हसळ्यात दि. ८ मार्च २०१८  रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय येथे  जागतिक महिला दिन साजरा करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हसळा तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री  रामदास झळके साहेब,  म्हसळा तालुक्याचे प्रथम नागरिक सभापती उज्ज्वला ताई सावंत, उपसभापती मधुकरजी गायकर साहेब,  म्हसळा पंचायत समिती सदस्या छाया म्हात्रे, गटविकास अधिकारी वाय. एम. प्रभे साहेब, नायब तहसीलदार मोरे साहेब, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रभारी रेणुका पाटील, पी. एम. गायकवाड विस्तार अधिकारी  श्री कोरडे अण्णा, परिवेक्षिका पालवे,  हावरे मॅडम  आदी मान्यवर उपस्थित होते.          .                              .       तहसीलदार झळके साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आजच्या स्थितीत महिला हि खुप क्षेत्रात अग्रसर  आहे.   एक महिला शिकली तर एक कुटुंब शिकते म्हणून कुटुंबातील महत्त्वाचा कणा हा महिला आहे  समाजाला आदर्श देण्याचे काम एक महिला करत असते म्हणून महिला सक्षम असणे आवश्यक आहे. गटविकास अधिकारी प्रभे साहेब यांनी विविध महिला नेत्यांचा आदर्श देत जागतिक महिला दिनाचे स्वरूप स्पष्ट केले उपस्थित अंगणवाडी सेवकांना शुभेच्छा दिल्या.    सभापती सांवत मॅडम आणि उपसभापती गायकर साहेब,  पंचायत समिती सदस्या छाया म्हात्रे यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.           .                           .         जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चालू शैक्षणिक वर्षांत आदर्श परिवेक्षिका श्रीमती  वैभवी विठोबा हावरे मॅडम आणि आदर्श अंगणवाडी सेविका लतिका धोंडु धुलप यांचा यथोचित गौरव करण्यात आले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रेणुका पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन पी. एम. गायकवाड यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा