अलिबाग, दि.४ : राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण,माहीती तंत्रज्ञान व अन्न
नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या
हस्ते तळा तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुर झालेल्या
रस्त्यांचे भुमिपुजन व जिल्हा नियोजन मंडळातुन विविध मंजुर झालेल्या
विकासकामांचे भुमिपुजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद
अध्यक्ष अदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकुर, नगराध्यक्ष सौ.रेश्मा मुंढे,
कृष्णा कोबनाक,सतिश धारप, रवी मुंढे,मिलींद पाटील, प्रांताधिकारी बाळासाहेब
तिडके,प्रभारी तहसीलदार वसावे,तळा पोलीस निरीक्षक संजय साबळे, गटविकास
अधिकारी व्ही.व्ही यादव आदी उपस्थित होते. प्रारंभी सोनसडे येथील
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याचे भुमिपुजन करण्यात
आले. याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून
रस्ता शहराला जोडून दळणवळण सुकर होण्यासाठी ही योजना राबविली जात आहे.
आ.प्रशांत ठाकुर यांनी आपल्या मनोगतात विविध विकासकामांची माहीती यावेळी
दिली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुर झालेल्या रस्त्यांचे भुमिपुजन !
Admin Team
0
Post a Comment