म्हसळा तालुक्यातील शिवसेनेतील आऊट गोईंग थांबेना ! बाळ करडे , समीर बनकर यांच्या पाठोपाठ भालचंद्र म्हसकर , जनार्दन पयेर या दोन माजी सेना पदाधिकाऱ्यांचा देखील शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ! ११ मार्च ला शरद पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील शिवसेनेतील आऊट गोईंग थांबेना ! असेच चित्र सध्या तालुक्यातील राजकीय वर्तुळात पहावयास मिळत आहे. मागील शनिवारी(३ मार्च) शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते सुभाष(बाळ) करडे तसेच माजी तालुका प्रमुख समीर बनकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या म्हसळा येथील पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या जिल्हा व तालुका नेतृत्वावर टीका करीत शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ! करण्याची घोषणा केली होती व तालुक्यातील आणखी अनेक शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी , कार्यकर्ते शिवसेनेतून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत असे राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून समजले होते त्याअनुषंगाने म्हसळा तालुक्यात शिवसेनेची मुहुर्तमेढ ज्या गावात रोवली गेली त्या खरसई गावातील निष्ठावंत शिवसैनिक व माजी शाखा प्रमुख भालचंद्र म्हसकर व माजी उपविभाग प्रमुख जनार्दन पयेर हे सुद्धा शिवसेनेला येत्या ११ मार्च ला राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह प्रवेश करणार असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. यामध्ये या दोघांनीही शिवसेनेच्या जिल्हा व तालुका नेतृत्वावर कडाडून टीका केली आहे. जिल्हा प्रमुख रवी मुंढे यांच्या कडे अनेकदा तालुकाप्रमुख , उपतालुकाप्रमुख यांच्या कार्यपद्धतीवर आपण नाराज असल्याचे सांगून देखील जिल्हा प्रमुखांनी फक्त याबाबत आमची बोळवणच केली. गेली अनेक वर्षे निष्ठेने शिवसेनेचे काम करून देखील तालुकाप्रमुख शिर्के यांनी आम्हाला अनेक निर्णयात डावलले. फक्त चार चौघेच जर संपूर्ण तालुक्याच्या संघटनात्मक, विकासात्मक निर्णय घेत असतील तर तालुक्यातील निष्ठावंत सैनिकांचा वापर हा केवळ निवडणुकी मध्ये राबविण्या करिताच राहिला आहे असेच यावरून स्पष्ट होत आहे. याआधी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना संघटनेचे कार्य चालत असे परंतु हे तालुका प्रमुख आपल्या कार्यालयाच्या ए.सी. केबिन मध्य बसून आपल्याच सहकाऱ्यांची गळाचेपी करण्याचे १०० टक्के राजकारण करीत आहेत. या सर्व प्रकाराने गेल्या काही महिन्यांपासून तालुका शिवसेनेत होणाऱ्या घुसमटी तून सुटका करून घेण्यासाठीच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असे जनार्दन पयेर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Post a Comment