श्रीवर्धन आगाराचे वेळापत्रक कोलमडलेले...

श्रीवर्धन आगाराचे वेळापत्रक कोलमडलेले...

श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन परिवहन आगाराचे वेळापत्रक मागील चार महिन्यांपासून कोलमडून पडले आहे . अनेक लांब पल्ल्याच्या बसफेऱ्याच उशीराने सुटत असल्याने प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे . स्थानिक फेऱ्या सुद्धा अनेक वेळा उशीराने सुटतात तर अनेक वेळा रद्द केल्या जातात . काही वेळेला लांब पल्ल्याच्या फेऱ्या देखिल रद्द करण्याची पाळी आगार व्यवस्थापनावर येते . श्रीवर्धन आगारातून सकाळी पाच वाजता श्रीवर्धन मुंबई वातानुकुलित शिवशाही फेरी सुरु झाली आहे तर दुपारी तीन वाजता श्रीवर्धन भिवंडी ही वातानुकुलित शिवशाही बस सेवा सुरु करण्यात आली आहे . शिवशाही बसगाड्या चालविण्यासाठी खाजगी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे . श्रीवर्धन आगारात दोन किंवा तीन निमआराम बस सुस्थितीत आहेत , बाकीच्या बसेस भंगार झालेल्या आहेत . लाल बसगाड्या सुद्धा चार पाच सुस्थितीत आहेत तर बाकी भंगार अवस्थेत आहेत . रस्त्यात बसगाड्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखिल मोठ्या प्रमाणावर आहे . काही बसगाड्या रस्त्याने जाताना कितीतरी मोठ्या प्रमाणात खडखड आवाज काढत जात असता अनेक बसगाड्या मधिल आसन तुटलेल्या अवस्थेत असतात तर का गदागदा हालत असतात . त्यामुळे प्रवाशांना बसण्याची भिती असते . बरेच वेळा श्रीवर्धन परिवहन स्थानकातून सुटलेली बसगाडी दहा ते बारा किलोमीटरवर जाऊन नादुरुस्त होण्याचे प्रकार घडतात या आगोदर शालेय सहलीसाठी गाड्या द्याव्या लागत असल्याने वेळापत्रक कोलमडत असल्याचे सांगितले जात होते परंतु आता शालेय सहली बंद झाल्या आहेत . परिवहन स्थानकाचे दुरुस्तीचे काम मागील दीड वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे . या बाबतीत श्रीवर्धन आगाराच्या आगार व्यबस्थापक श्रीमती रेश्मा गाडेकर यांच्या जवळ भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि , खराब रस्त्यामुळे बसगाड्याचे पाटे तुटण्याचे प्रकार होत असतात पुढील आठवड्यात श्रीवर्धन आगरात चार शिवशाही बस दाखल होणार असुन बोरीवली नालासोपारा , मुंबई डोंगरी या मार्गावर त्या सुरु करण्यात येणार आहेत . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा