४० वर्षांपूर्वी कोणीतरी तंबाखूचं व्यसन करण्यापासून रोखायला हवं होतं – शरद पवार

जीवघेण्या व्यसनाच्या आहारी जाण्यापासून कोणीतरी थांबवायला हवं होतं.

टीम म्हसळा Live

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या तंबाखू आणि सुपारीच्या व्यसनाबद्दल खेद व्यक्त केला आहे. ४० वर्षांपुर्वी या जीवघेण्या व्यसनाच्या आहारी जाण्यापासून आपल्याला कोणीतरी रोखायला हवं होतं असंही त्यांनी म्हटलं आहे. इंडियन डेन्टल असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. इंडियन डेन्टल असोसिएशनने २०२२ पर्यंत तोंडाच्या कर्करोगावर पुर्णपणे नियंत्रण आणण्याचा निर्धार केला आहे.
जीवघेण्या कॅन्सरवर मात करुन पुन्हा जोमाने आयुष्याचा प्रवास सुरु केलेल्या शरद पवारांनी कार्यक्रमात आपले मत मांडले. यावेळी त्यांनी आपल्याला कॅन्सर झाल्यावर झालेला त्रास, उपचार घेताना झालेल्या वेदना सांगितल्या. 'सर्जरीमुळे आपल्याला प्रचंड त्रास झाला. आपले दात काढण्यात आल्याने तोंड पुर्णपणे उघडण्यास त्रास होत होता. बोलताना आणि अन्न गिळतानाही असह्य वेदना व्हायच्या', असं शरद पवारांनी सांगितलं. यावेळी बोलताना शरद पवारांनी इंडियन डेन्टल असोसिएशनला लागेल ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा