आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर आयोजीत पक्षाच्या विराट जाहीर सभेत बोलताना मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे:
🔸महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष संपला असं ज्यांना वाटतंय त्यांनी व्यासपीठावर या आणि हा जिवंत महाराष्ट्र पहा
🔸या वर्षीपासून गुढीपाडव्याला मनसेची सभा होणार म्हणजे होणार
🔸सगळेच प्रश्न संपल्यामुळे आमचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री गाणी गात आहेत. हे काम आहे का मुख्यमंत्र्यांचं, अर्थमंत्र्यांचे? हे जर इतर कोणी केलं असतं तर माध्यमांनी किती टीका केली असती?
🔸निरव मोदी प्रकरण विसरावं म्हणून श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी इतकी चघळली. श्रीदेवी असतील मोठ्या अभिनेत्री पण प्रश्न पडतो की त्यांनी असं काय महान काम केलं की त्यांचा पार्थिव देह तिरंग्यात गुंडाळला. नंतर बातमी आली की त्या दारू पिऊन गेल्या.अश्या माणसाला तुम्ही असा सन्मान देता?
🔸मोदी आणि अमित शाह यांच्या सांगण्यावरुन कित्येक वृत्तपत्र आणि चॅनल्समध्ये पत्रकारांना, संपादकांना काढून टाकण्यात आलं
🔸आणीबाणीची परिस्थितीच सध्या देशात आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी जितकी दाखवली तशी जस्टीस लोयांच्या मृत्यूची बातमी का नाही दाखवली गेली?
🔸जस्टीस लोयांच्या मृत्यूची केस एका महिला न्यायाधीशाकडे होती, त्या निस्पृह होत्या म्हणून त्यांच्याकडून केस काढून घेतली असं वाटू नये म्हणून महाराष्ट्रात १०० न्यायाधीशांची बदली केली. सुप्रीम कोर्टातील त्या ४ न्यायाधीशांनीच पण तेच सांगितलं की आमच्यावर दबाव आहे
🔸तुम्ही जर हिटलर आणि त्याच्या प्रचारावरची पुस्तकं नीट वाचलीत तर तुमच्या लक्षात येईल की सध्या अमित शहा आणि मोदी त्याच पद्धतींचा वापर करत आहेत
🔸पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा हे अक्षय कुमारचे सिनेमे हे केंद्रशासित पुरस्कृत आहेत. अक्षय कुमार सध्या आधुनिक मनोज कुमारांच्या भूमिकेत आहेत. आणि आपल्याला देशभक्ती शिकवणारे अक्षय कुमार कॅनडाचे नागरिक आहेत
🔸मेट्रोच्या विरोधात कोणत्याही बातम्या द्यायच्या नाहीत ते सक्त आदेश आहेत असं मला काही पत्रकारांनी सांगितलं
🔸मी विरोधाला विरोध करणाऱ्यातला नाही, जर एखादी गोष्ट मराठी माणसाच्या हिताची होणार असेल तर माझा पाठिंबा असेल
🔸नितीन गडकरी साबणाच्या फुग्यासारखे घोषणांचे आकडे उडवत फिरत असतात
🔸शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत, त्यांना पैसे दिले जात नाहीत. आज परिस्थती अशी आहे की दलाल राज्य चालवत आहेत
🔸धर्मा पाटलांची जमिन २०४ गुंठे आहे तिथे त्यांना ४ लाख मोबदला दिला गेला, आणि बाजूच्याच जमिनीला जी ७४ गुंठे आहे, जिला कोट्यवधी रुपये दिले गेले. धर्मा पाटलांनी दलालाला जमीन विकायला नकार दिला. समृद्धी महामार्गात हेच सुरु आहे
🔸शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अश्या घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. शेती परवडत नाही, आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना नोकऱ्या हव्यात पण त्या मिळत नाहीयेत. त्या नोकऱ्या बाहेरच्या लोकांना मिळत आहेत
🔸आमच्या कडे शेतच कुंपण खातंय. आपलीच लोकं पैसे घेऊन खोटी लायसन्स देत आहेत, तहसीलदार चिरीमिरीला विकले जात आहेत. हे सर्वत्र सुरु आहे
🔸महाराष्ट्रातील वनजमिनी लाटल्या जात आहेत, तिथे अनिधिकृत बांधकामं सुरु आहेत. आणि ही अनधिकृत बांधकामं करणारे बाहेरच्या राज्यातून येणारे आहेत. वसईत वनजमिनीवर ज्या अनधिकृत चाळी बांधल्या गेल्यात ते बांधणारे परप्रांतातील आहेत, त्यांच्या नावावर गंभीर गुन्हे आहेत
🔸आमचा ग्रामीण महाराष्ट्रातल्या माणसांना हक्काचं घर मिळत नाहीये, नोकऱ्या मिळत नाहीयेत आणि बाहेरचे येऊन घरं, नोकऱ्या बळकावत सुटलेत
🔸बेरोजगारांची नोंदणीच करायची नाही असा फतवा आता केंद्रसरकारने काढला आहे त्यामुळे नक्की किती बेरोजगार आहेत याचा आकडा कधीच कळणार नाही
🔸बोफोर्सपेक्षा देखील सगळ्यात मोठा घोटाळा 'राफेल विमान' खरेदीचा आहे. राफेल विमानाची किंमत आहे ५५० कोटी आणि सरकारने फ्रान्स सरकारकडून १६०० कोटींना घेतली आहे. हा भ्रष्टाचार आहे, यावर कोणी बोलत नाही. आणि हे काम कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी ग्रुपच्या रिलायन्स कंपनीला दिल गेलंय
🔸१ लाख दहा हजार कोटींचं कर्ज घेऊन बुलेट ट्रेन प्रोजेक्ट कोणासाठी आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कर्जाचा भार का उचलायचा
🔸१९६० ला मुंबई महाराष्ट्राला मिळाली.मुंबई महाराष्ट्राला देऊ नका यासाठी नेहरूंवर वल्लभभाई पटेलांचा दबाव होता. तरीही मुंबई महाराष्ट्राला मिळाली याचा जो राग आहे त्यासाठी बुलेट ट्रेन हा प्रकल्प आहे
🔸मुंबई बडोदा एक्प्रेस वे, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधलं फायनान्शियल सेंटर हे गुजरातला हलवलं गेलं. या सगळ्यातून तुमच्या लक्षात येईल की मुंबई महाराष्ट्राला तोडण्याचा डाव सुरु आहे
🔸देशात राममंदिराच्या नावाखाली पुन्हा दंगली घडवल्या जातील. कोर्टाचा निकाल आला की दंगली सुरु होतील. राम मंदिर व्हायलाच पाहिजे मलाही ते हवंय. पण निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराच्या नावाखाली दंगली होणार असतील तर मंदिर पुढच्या वर्षी निवडणुकांनंतर झालं तरी चालेल
🔸दाऊदला भारतात यायचं आहे आणि त्याला त्याचे शेवटचे दिवस भारतात घालवायचे आहेत हे मी काही महिन्यांपूर्वी बोललो होतो. नेमकं तेच माध्यमांमध्ये काही दिवसांपूर्वी आलं. त्याला भारतात आणण्यासाठी दाऊदशी तडजोडी सुरु आहेत
🔸पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करू असं मोदी म्हणाले आणि नंतर निवडणुका जिंकल्यावर अमित शहा म्हणाले हा ‘चुनावी जुमला‘ आहे
🔸शाळांनी १ किलोमीटरच्या परिघातील मुलांनाच घेतलं पाहिजे असा सक्त आदेश सरकार काढतंय, पण हा नियम अल्पसंख्याकांना नाही. महाराष्ट्रातले मराठी मुस्लिम नाही पण बाहेरून आलेले मुस्लिमविद्यार्थी शाळेतल्या सरस्वती वंदनेला उभे राहत नाहीत
🔸मुसलमानांच्या मोहल्ल्यांना मुद्दामून आगी लावल्या जात आहेत आणि तिथे नंतर इमारती उभ्या करून या मुसलमानाना पक्की घरं दिली जाण्याचा डाव सुरु आहे
🔸मेट्रोच्या नावाखाली मोक्याच्या जमिनी, इमारती परप्रांतीय बळकावत आहेत आणि हळूहळू इथल्या मराठी माणसांना बाहेर काढण्याचं षडयंत्र रचलं जात आहे
🔸मराठी माणसाच्या मनात पद्धतशीरपणे जातीय विष कालवलं जात आहे
🔸१९४७ ला भारताला पहिलं स्वातंत्र्य मिळालं, दुसरं स्वातंत्र्य १९७७ ला मिळालं, तिसरं स्वातंत्र्य २०१९ला मिळणार. मोदी २०१४ ला म्हणाले काँग्रेसमुक्त भारत हवाय. मोदी गुजरातच्या पलीकडच्या भारताचा दुस्वास करत आहेत, त्यामुळे मोदी मुक्त भारत हवाय
🔸नरेंद्र मोदी मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र सारख्या फसव्या घोषणा करत आहेत. एक रुपयाची गुंतवणूक येत नाहीये आणि तरीही घोषणा सुरु आहेत. आणि दुसरीकडे अमित शहा म्हणतात की भजी विकणं हा पण रोजगार आहे
🔸मग मोदी इतके देश फिरले ते वड्याचं पीठ आणायला गेले होते का?
🔸देशात सत्ता बदल झाल्यावर जेंव्हा नोटबंदीची चौकशी होईल तेंव्हा हा १९४७ नंतरचा सगळ्यात मोठा घोटाळा म्हणून येईल
🔸काँग्रेसच्या काळात जे जे जेलमध्ये गेले ते भारतीय जनता पक्षाच्या काळात सत्तेत बाहेर आले. २०० कोटींच्या घोटाळ्याची सीबीआयची केस चालू असताना निरव मोदी बाहेर कसा पळाला? जे काँग्रेसच्या काळात झालं तेच भाजपच्या काळात सुरु आहे
🔸मराठी बांधवाना हात जोडून सांगतो की बेसावध राहू नका. तुमच्या बद्दल, महाराष्ट्राच्या बद्दल यांच्या मनात आकस आहे हे लक्षात घ्या
🔸आमच्या सणांवर आमचीच लोकं आडवी जातात.. मुंबईत दहीहंडी हा पारंपारिक सण साजरा झालाच पाहिजे
🔸माझं माध्यमांना आवाहन आहे की या सरकारच्या विरोधात लिहिते व्हा

Post a Comment