महावितरणकडून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंते वाऱ्यावर वर्षभर काम वाटप नसल्याने अभियंते हवालदिल

महावितरणकडून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंते वाऱ्यावर
वर्षभर काम वाटप नसल्याने अभियंते हवालदिल

मेंदडी वार्ताहर


रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून गेली वर्षभर काम वाटप न झाल्याने नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंते हवालदिल असून त्यांच्यापुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की,राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार सु‍शिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्‍यांच्‍या रोजगारीचा प्रश्‍न सुटावा या दृष्‍टीने शासनाने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्‍यांना थेट लॉटरी पद्धतीने काम घेणे ही योजना सुरू केली असून या योजनेत जिल्‍ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी नोंदणी शुल्क व योग्य ती कागदपत्रे महावितरण कार्यालयात सादर करून ठेकेदार प्रमाणपत्र मिळवले आहे.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बेरोजगार इंजिनीअर्सना काम देण्यासंबंधीचे धोरण राज्य सरकार तयार करेल, असे जाहीर केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धर्तीवर महावितरणने ही योजना सुरू केली आहे. यानुसार विभागांतर्गत एकूण वार्षिक कामांपैकी किमान ५० टक्के ठराविक नवीन आणि देखभाल-दुरुस्तीची कामे बेरोजगार विद्युत इंजिनीअर्सना लॉटरी पद्धतीने देण्यात येणार आहेत. पहिल्यावर्षी प्रत्येकी १० लाख रुपयांपर्यंतची वार्षिक ५० लाखांची कामे देण्यात यावीत. ही कामे मुदतीत पूर्ण केल्यानंतर दुसऱ्यावर्षी १५ लाखांपर्यंतची एकूण वार्षिक पाच कामे अशी एकूण ७५ लाखांपर्यंतची कामे वाटप करण्यात यावीत असा शासन निर्णय आहे.बेरोजगार इंजिनीअर्सना विनास्पर्धा कामे वाटप करण्यासाठी जिल्हावार कामवाटप समिती स्थापन करण्यात आली असून अधीक्षक अभियंता हे समितीचे अध्यक्ष आहेत. मंडल कार्यालयातील कार्यकारी अभियंता समितीचे सदस्य सचिव आणि सदस्य म्हणून व्यवस्थापक (वित्त व लेखा), कामेवाटप करावयाच्या विभागातील कामांशी संबंधित कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता काम पाहणार आहेत.असे असले तरी रायगड जिल्ह्यात गेल्या काम वाटप समितीची बैठक न झाल्याने वर्षभरात काम वाटप झाले नसल्याने नोंदणीकृत सुशिक्षित विद्युत अभियंते बेरोजगार बनून फिरत असल्याचे विदारक चित्र आहे.या योजनेनुसार 50 टक्के कामे सु.बे.अभियंत्यांना देने अपेक्षीत असताना कोणतेही काम दिले जात नसल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा