पत्रकाराला स्वतंत्र कायद्याची व संरक्षणाची गरज : राजीव खांडेकर
म्हसळा येथे रायगड प्रेस क्लब चा १३ वा वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा संपन्न
म्हसळा : सुशील यादव
“नक्कीच पत्रकाराला स्वतंत्र कायद्याची व संरक्षणाची गरज आहे” असे प्रतिपादन ए.बी.पी. माझा चे संपादक राजीव खांडेकर यांनी म्हसळा येथे पार पडलेल्या रायगड प्रेस क्लब च्या १३ वर्धापन दिन निमित्त उपस्थिताना संबोधित करताना केले. रायगड च्या पत्रकारांनी लेखणीतून अनेक समस्यांना वाचा फोडली आणि लेखणीतून ज्या समस्या सोडविता आल्या नाहीत त्या समस्या सोडविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून अनेक प्रश्न सोडवून संपूर्ण महाराष्ट्रातील पत्राकांसमोर एक आदर्श ठेवला आहे असे खांडेकर यांनी रायगडच्या पत्रकारांचे आपल्या मनोगतातून कौतुक केले. म्हसळा येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये रायगड प्रेस क्लब चा हा १३ वा वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमा मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.एम. देशमुख ,उल्का महाजन , नरेंद्र वाबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात रायगड प्रेस क्लब च्या २०१८ च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार दैनिक शिवनेर चे संपादक नरेंद्र विश्वानाथ वाबळे, कै. निशिकांत ऊर्फ नानासाहेब जोशी स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार जगन्नाथ ओव्हाळ, निर्भीड पत्रकार पुरस्कार प्रदीप मोकल, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार अलिबागचे समीर मालोदे , युवा पत्रकार पुरस्कार लोकमत कर्जतचे कांता हाबळे व दैनिक सागर म्हसळा चे निकेश कोकचा , सावित्रीबाई फुले महीला पत्रकार पुरस्कार रायगड टाईम्स महाडच्या मयुरी खोपकर , स्व. सचिन चांदणे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार उल्का महाजन , रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघ पुरस्कार पनवेल लाईव्ह चानल चे सुमंत नलावडे, दैनिक सकाळ श्रीवर्धनचे संजय मांजरेकर दैनिक रत्नागिरी टाईम्स माणगाव चे गौतम जाधव आदीना प्रदान करण्यात आला.
राज्य सरकारने पत्रकार संरक्षण कायदा केला मात्र या कायद्याची अंमलबजावणी मात्र अद्यापही होत नाही. त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात येत्या ७ एप्रिल ला “पत्रकार संरक्षण कायदा” च्या प्रतींची होळी करणार.
एस.एम. देशमुख , संस्थापक रायगड प्रेस क्लब

Post a Comment