गुन्हेगारी हा लोकशाहीला मिळालेला मानवनिर्मित आजार : धर्मराज सोनक

गुन्हेगारी हा लोकशाहीला मिळालेला मानवनिर्मित आजार  : धर्मराज सोनक


श्रीवर्धन : प्रतिनिधी

लोकशाहीने सर्वांना समान हक्क प्रदान केलेले आहेत . गुन्हेगारी हा लोकशाहीला मिळालेला मानवनिर्मित आजार आहे . आपल्या आसपासचे वातावरण , शिक्षण आणि आपला मित्र परिवार यामुळे आपले भविष्य घड़त असते , असे प्रतिपादन बोर्लीपंचतनचे सहा . पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी केले . लोकमत व अभिनव भारत संघ संचालित ज्ञानदान क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझे गाव माझी शाळा ' या उपक्रमात ते बोलत होते.
‘ माझे गाव माझी शाळा ’ या उपक्रमात बालगुन्हेगारी व उपाययोजना विषयावर न्यू इंग्लिश मॉडर्न हायस्कूलमध्ये विद्यार्थीवर्गास मार्गदर्शन करत असताना सोनके यांनी मुक्तपणे संवाद साधला . बाल व गुन्हा हे दोन्ही शब्दच अतिशय वेगळे वाटतात , परंतु ही बस्तुस्थिती आहे . आज सोशल मीडियामुळे माहितीचे जाळे निर्माण झाले आहे . लहान मुले व मोबाइल यांची अवाजवी मैत्री अनेक संकटांना जन्म देत आहे . फेसबुक व व्हॅट्सअॅप यामुळे मैत्रीची क्षितिजे उंचावर गेली , परंतु अनेक गुन्ह्याचा जन्म झाला आहे भावी जीवनाच्या दृष्टीने ही बाब अतिशय धोकादायक असून पालकांसाठी काळजी निर्माण करणारी आहे भावी आयुष्य चांगले बनावे यासाठी पालक मुलांना उच्च वस्तू उपलब्ध करून देतात , परंतु मुले दुरुपयोग करतात . पर्यायाने गुन्हेगारीत वाढ होते . तुमच्या समस्या तुमच्या पालकांना सांगा , आम्हास सांगा तुमच्या अडीअडचणी दूर केल्या जातील शिक्षक व विद्यार्थी संवाद गरजेचा आहे , आपल्या मित्राची चूक शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्या . शालेय जीवनात मज्जा वाटते , परंतु ती कायदेशीर सजा ठरू शकते याची जाणीव ठेवा . चित्रपट व मालिका यांच्यामधील आयुष्य याची वास्तविक आयुष्याशी तुलना करु नका . जीवन सुंदर आहे फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निकोप ठेवा . तुम्ही लहान आहात त्यामुळे वडीलधारी मंडळी जे शिक्षण देतात त्याकडे लक्ष द्या . व्यक्तीचे बर्तन त्याच्या संस्काराचे प्रतीक असते हे सदैव लक्षात असू द्या तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे ‘ लोकमतच्या कार्यास मी पोलीस प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतो व भविष्यासाठी शुभेच्छा देतो असे सहा पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके या कार्यक्र मास मुख्याध्यापक संतोष मुरकर , शाळा समन्वयक एन . एम . बापट , डी . बी . बाणी , जी . एस . शिरवटकर , ए . एस . एस . एस . कोसबे , एस . एस . तोडणकर आदी उपस्थित होते सूत्रसंचालन खुशी यादव या विद्यार्थिनीने केले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा