म्हसळ्यात बीएसएनएल चे तीनतेरा....

म्हसळ्यात बीएसएनएल चे तीनतेरा                      

म्हसळा  -  म्हसळा तालुक्यातील  सांगवड या गावात  बीएसएनएल कंपनीचा टॉवर होऊन आज  ८, वर्षे पूर्ण झाली. पण तो टॉवर चालू करण्यासाठी  बीएसएनएल कंपनीची यंत्रणा १००% अयशस्वी ठरली आहे.       .                                 .      म्हसळा तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ भाग ओळखला जातो  रस्ते धड नाहीत   दळणवळण ची साधणे नाहीत अशा परिस्थितीमध्ये बीएसएनएल चा टॉवर उभा होऊन ७ ते ८ वर्षे झाली तरी तो चालू होऊ शकला नाही  या मध्ये संपूर्ण  बीएसएनएल कंपनीचा संपूर्ण पणे हलगर्जीपणा दिसून येत आहे.                                   .    .       आज एकविसाव्या शतकात भारत देश नवीन संशोधनात उंच भरारी घेऊन  आणि जागतिक पातळीवर अस्तित्व देशाचे अबाधित ठेवत आहे.  आशा वातावरण  भारत संचार निगम लिमिटेड कंपनी. टॉवर चालू करण्यासाठी  आठ वर्षांची प्रतीक्षा करावी लागत असेल तर या देशात वेगले आश्चर्य म्हणावे लागेल.                            .        .         
या सांगवड गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री  संतोषजी घडशी यानी पनवेल  येथील बीएसएनएल चे विभागीय मॅनेजर राव साहेब,  वळवी साहेब, महाडचे कुलकर्णी साहेब यांना संपर्क करून  सतत पाठपुरावा करत आहेत  पण यांना संपर्क केला असता  आम्ही काम  करण्याचा विचारात आहोत., आमच्या कडे  काही  साहित्य उपलब्ध नाही आहे,  वरील आॅफीसचा आदेश येईल तेंव्हा आम्ही बघू अशी उत्तरे देऊन वेळ मारून घेतात अधिकारी वर्ग  म्हणून  या पंचक्रोशीतील लोकांनी एक हाती विचार केला आहे. की, म्हसळा बीएसएनएल कार्यालय (दिघी रोड)  येथे जन आंदोलन करण्याच्या दृष्टीने या परिसरातील गावे  सांगवड,  ठाकरोळी,  न्यू अनंतवाडी,  कोकबल,  कोकबल वाडी आणि  ईतर गावे एकत्र ऐऊन आपला आंदोलन च्या मार्गाने बीएसएनएल च्या विरोधात आवाज उठवणार अशी माहिती घडशी यांनी  प्रसिद्धी माध्यमाना दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा