आंबेत शाळेचे छत पुन्हा कोसळले; जिल्हा परिषद झोपेत...सुदैवाने सुट्टी असल्यामुळे अनर्थ टळला...

आंबेत शाळेचे छत पुन्हा कोसळले; जिल्हा परिषद झोपेत...सुदैवाने सुट्टी असल्यामुळे अनर्थ टळला...

म्हसळा,
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आंबेत शाळेचे छप्पर सोमवारी ( दि . १९ ) पुन्हा एकदा कोसळून पडले . सुदैवाने शाळेची सुट्टी झालेली असताना ही घटना घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला . गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे . जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग मात्र झोपेत आहे सोमवारी , १९ मार्च रोजी शाळेचे छत कोसळले . सुदैवाने दुपारनंतर शाळेला सुट्टी होती . अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता . २९ जानेवारी रोजी आंबेत येथील जिल्हा परिषदेच्या मराठी आणि उर्दू शाळेचे छप्पर कोसळले होते . त्यानंतर आजतागायत इथले विद्यार्थी शाळेच्या वन्हांड्यात बसत आहेत . राष्ट्रवादीचे नेते आ . सुनील तटकरे यांनी या घटनेची दखल घेत १५ दिवसांत जिल्हा परिषद चालल्या अध्यक्षा आदिती तटकरे यांच्यामार्फत शाळेला नवीन खोली आणून देतो . असे आश्वासन दिले होते . तेदेखील हवेत विरले आहे जिल्हा परिषदेला तर या घटनेचे सोयरसुतक नसल्याची गत आहे आंबेत प्राथमिक उर्दू मराठी शाळा तालुक्यात सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा आहे एका बाजूला जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत चालल्या असताना आंबेतसारखी शाळा टिकून आहे . मात्र जिल्हा परिषदेला त्याचे काही पडलेय , असे दिसत नाही . त्यामुळे मोडकळीस आलेल्या शाळेत लहान - लहान विद्यार्थी जीव मुठीत घेवून बसत आ हेत . त्यांची बसण्याची व्यवस्थासुद्धा नीट नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा