म्हसळा रुग्णालयातील कर्मचारी महिने ७ पगाराविना ; मार्च अखेर पगार न दिल्यास काम बंद आंदोलन
● काळ्या फिती लावून कामाला केली सुरुवात ● म्हसळा रुग्णालयातील लिपिक करतो अलिबाग रुग्णालयात काम
● मार्च अखेर पगार न दिल्यास काम बंद आंदोलन सुरू करणार
म्हसळा : महेश पवार
म्हसळा ग्रामीण रुग्णालय हा अनेक वर्षा पासून सुरू होणार असे अनेक भाकीत ऐकण्यास मिळत होते . आणि अखेर ऑगष्ट २०१७ ला रुग्णालय सुरू झाले . त्याच वेळी डॉक्टर नियुक्ती न करता नर्स नियुक्ती केल्या त्यांनीच पाच महिने प्राथमिक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या साहाय्याने ग्रामीण रुग्णालय सुरू ठेवले परंतू तेव्हा पासून गेली सात महिने नर्स स्टाप ७ , तंत्रज्ञ १ , कक्षसेवक २ , शिपाई१ सहाय्यक अधीक्षक १ अशा १२ कर्मचारी वर्ग आजही पगाराविना आपली सेवा जनतेला देत आहेत . आपला पगार मिळत नाही म्हणून त्यांनी शल्यचित्सक डॉ . गवळी , रावखंडे मॅडम , अधिक्षक डॉ मधुकर ढवळे या सर्वांचे दरवाजे ठोठावले परंतू आम्हाला आज पर्यंत शाब्दीक आश्वासनापलिकडे काहिच केले नाही . विशेष म्हणजे संबधीत कर्मचारी या रावखंडे मॅडम यांना भेटण्यास गेल्या त्या वेळी त्यांची भेट नाकारली . तुमचा पगार हा दिलेला लिपिक विष्णु साबरे करेल असे सांगुन परत पाठविले , परंतू दिलेला लिपिक हा म्हसळा ग्रामीण रुग्णालय मध्ये हजर असायला हवे पण तो लिपीक अलिबाग रुग्णालय मध्ये काम करतो आहे . त्या मुळे म्हसळा रूग्णालय मध्ये सर्वच ठिकाणी प्रशासकीय कामात वेळोवेळी अडचण निर्माण होत आहे . शासनानी सुरू केलेले रूग्णालय हयाची सर्व जबाबदारी डॉ . गवळी सर , रावखंडे मॅडम , अधिक्षक डॉ मधुकर ढवळे यांना दिली असताना काम करणारे कर्मचारी गेली सात महिने पगारा शिवाय काम करत असल्याचे चित्र दिसत असताना आपली केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत . रूग्णालयातील कर्मचारी यांना शासनाची राहण्याची सुविधा नसल्याने खाजगी जागेत राहुन पगार नसतांना भाड़े देखील दयावे लागत आहे . अशा दोन्ही बाजूनी साकडीत पडलेल्या कर्मचारी वर्गाचे शोषण होत आहे त्यामुळे आज त्या चक्क काळया फिती लावून निषेध करत कामाला सुरुवात केली आहे आमचा पगार मार्च अखेर झाला नाही तर काम बंद आंदोलन सुरु करु असा निर्वाणीचा इशारा संबधीत प्रशासनाला दिला आहे आजच्या काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे निवेदन डॉ . गवळी सर , रावखंडे मॅडम अधिक्षक डॉ मधुकर ढवळे , पोलिस स्टेशन यांना रितसर मेल मार्फत पत्र दिला आहे..
पगारा संदर्भात मी स्वतः चौकशी करून माहीती घेत आहे . काही त्रुटी पूर्ण करून मार्च अखेर पगार होईल . जो लिपिक आहे तो अलिबाग ठिकाणी बसून पगाराची प्रोसेस करत आहे.
- डॉ . अजित गवळी, जिल्हा शल्यचित्सक रायगड
आमची ८ जानेवारी २०१७ ला सरळ सेवा परीक्षा घेऊन १९ . ८ . २०१७ ला मुलाखती होऊन ऑडर दिल्या तेव्हा पासून आमच्या कडे कोणीच लक्ष देत नाहीत , केवळ आमच्या ऑफलाईन नियुक्ती केली पण ऑनलाईन पोर्टलला दिसत नाहीत , आमच्या आजही सेवा पुस्तिका भरल्या नाहीत , आम्हाला राहण्याची सुविधा नाही पगार नसताना आम्हाला स्वतःच्या पदरचे पैसे देऊन राहावे लागत आहे . आम्हाला पुरेपुर स्टाफ नसल्याने त्याचे भार आमच्यावरती पडला आहे . एक्स रे मशिन नाही , औषधनिर्माता अधिकारी नाही त्या मुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आम्हाला उत्तरे दयावे लागत आहेत . या विषयी आम्ही आमच्या वरिष्ठांकडे संपर्क केला परंतू आम्हाला शब्दा पलिकडे कोणतीच मदत केली नाही त्यामुळे आम्ही आज काळ्या फिती लावून कामाला सुरुवात केली आहे जर का आम्हाला मार्च अखेर आमचा पगार मिळाला नाही तर काम बंद आंदोलन करू .
- स्टाफ नर्स व कर्मचारी म्हसळा ग्रामीण रूग्णालय

Post a Comment