आकाश पाळण्यानी भरलेला ट्रक पलटी होऊन ७ जण जखमी:ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहायाने सर्वाना काढले बाहेर

आकाश पाळण्यानी भरलेला ट्रक पलटी होऊन ७ जण जखमी:ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहायाने सर्वाना काढले बाहेर

म्हसळा - निकेश कोकचा

रायगड जिल्ह्यातील प्रत्येक गावोगावी यात्रेला सुरवात झाली असून या यात्रेमध्ये मनोरंजनासाठी आणण्यात येणाऱ्या आकाश पाळण्याच्या ट्रकला म्हसळा शहरानजीक अपघात होऊन सात जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.या जखमींमध्ये एका तरुणीचा देखील सहभाग असून स्थानिक गावकर्यांनी तत्काळ जेसीबीच्या सहायाने अपघातग्रस्तांना बाहेर काढले.रोहा येथून आकाश पाळण्यानी भरलेला ट्रक म्हसळा शहरातील धावीर देव यात्रेसाठी येत येत असताना मौजे निगडी गावाच्या हद्दीतील चढनावर अचानक मोसम तुटल्याने चालक रफिक अहमद दाबीर यांनी ब्रेक मारला.ब्रेक मारल्यानंतर गाडीमध्ये असणाऱ्या अवजड आकाश पाळण्यामुळे गाडीचा समतोल बिघडून अपघात झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात ट्रक पूर्णपणे पलटी झाली असून त्यामध्ये असणाऱ्या सुनील रामदास वानखेडे वय २७ वर्षे,जगदीश पुंडलिक शिरोळे वय ५० वर्षे,कृष्णा वाघमारे,मुबीन मुन्ना खान वय २७ वर्षे,नायना मुबीन खान वय २२ वर्षे,मैमुदिन बासुमिया काझी वय ६० वर्षे,अहमद इब्राहीम शेख वय ६० वर्षे यांना मोठ्याप्रमाणात दुखापत झाली आहे.या अपघातग्रस्तांना गावकर्यांनी जेसीबीच्या सहायाने बाहेर काढले.अपघातग्रस्तांचा उपचार म्हसळा ग्रामीण रुग्णालयात सुरु असून गंभीरपणे जखमी असणाऱ्याना उपचारासाठी पुढे नेह्ण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.चालक रफिक अहमद दाबीर याच्या फिर्यादीवरून म्हसळा पोलीस ठाण्यात मोटार अपघात रजिस्टर क्र.३/२०१८ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड.कॉ.सुनील खंदारे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा