सलग सुट्टीमुळे रायगडातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले
मुरुड जंजीरा:अमूलकुमार जैन
सलग जोडून आलेल्या सुट्ट्या, पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. तालुक्यातील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी अक्षरश: गजबजले आहेत. पर्यटक खास कोकणी पद्धतीची मासळी, कोंबडी-वडा व घरगुती पदार्थांवर ताव मारत आहेत.
अलिबाग मुरुड तालुक्यातील लिबाग,वरसोली,किहीम,नागाव काशीद,बारशिव, बोर्ली,नांदगाव, मुरुड आदी ठिकाणच्या समुद्रकिनारी असलेल्या हॉटेल्समध्ये आरक्षणे फुल्ल झाली आहेत. मुरूड असल्याने पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. सलग आलेल्या सुट्टीमुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढतच आहे.नारळी, पोफळीच्या बागांनी बहरलेले, विस्तीर्ण व निळसर सागर किनार्यांवर पर्यटक मनसोक्त आनंद लुटत आहे. पर्यटक कोकणातील विविध प्रकारची मच्छी खाण्यासाठी कोकणात येतात. समुद्र किनारी होणारी गर्दी पाहता हॉटेल व घरगुती जेवण बनविणार्यांना अगोदरच मत्स्यपदार्थांची ऑर्डर देण्यात आली आहे. नववर्षाचा आनंद लुटण्यासाठी बच्चे कंपनीही तयारीला लागली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून मुरुड तालुक्यातील मुरुड आगरदांडा पर्यंत पसरलेल्या किनारपट्टीवरील अनेक गावांमधून डोंगर उतारावर अनेक पर्यटनस्थळे विकसित झाली आहेत. ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध असल्याने यावेळी मुंबई, पुण्यासाहित महाराष्ट्रातील तसेच अन्य राज्यातील पर्यटकांनी रूमची बुकिंग केली असल्याचक आर्यन गेस्ट हाऊसचे राजेंद्र मोरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले आहे. पर्यटकांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घेतला आहे. यामुळे काशीद हे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण बनले आहे.

Post a Comment