आमच्या डोक्यावरचा हंडा आज सर्वांच्या आशिर्वादाने आणि सहकार्याने उतरला - सौ . सरस्वती कापडी : अनंतवाडी ठाकरोलीत पाण्याची समस्या मिटली...

आमच्या डोक्यावरचा हंडा आज सर्वांच्या आशिर्वादाने आणि सहकार्याने उतरला -  सौ . सरस्वती कापडी

अनंतवाडी ठाकरोलीत पाण्याची समस्या मिटली...

म्हसळा : महेश पवार
म्हसळा तालुक्यातील न्यु . अनंतवाडी ठाकरोली मध्ये हनुमान जयंती सोहळ्या निमित्त ठाकरोली गावामध्ये ग्रामस्थाच्या स्वखर्चातुन तेरा लाख साठ हजार खर्च करून स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना यशस्वी झाली . शनिवारी ठाकरोली गावचे अध्यक्ष राजू जाधव व ग्रामस्थ यांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पन केले . या कार्यक्रमासाठी समाजसेवक सुरेश कुडेकर , खलिल काजी , नविन शेट्टी , महादेव शिंदे , राजाराम तिलटकर , जयसिंग बेडकर , गाव अध्यक्ष भिवा खोपरे , सरस्वती कापडी महिला अध्यक्षा ग्रामीण लक्ष्मण खेरटकर कार्यअध्यक्ष , अशोक शिगवण , संतोष घडशी , मंगेश मुंडे , प्रमोद घडशी , लक्ष्मण मोरे व अनेक समाज सेवक ग्रामस्थ मंडळ , महिला मंडळ व पंचक्रोशीतील समाज सेवक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते . यावेळी बोलताना राजू जाधव म्हणाले आमचा गाव हा मुळात डोंगर दरीत निसर्गाच्या सानिध्यात वसलेला आहे . सुरुवातीपासून आमच्या गावात एकी आहे ती आजही आहे . त्यामुळे आज आम्ही पिण्याचे पाणी योजना गावात राबवली आहे गावचा इतिहास पाहता गेल्या ७५ वर्षांपूर्वी गावाला आग लागली आणि त्याच आगीमधून आमच्या गावाचा पुनर्जन्म झाला . निर्मिती पासून ते संकटातून सावरण्यापर्यंत आम्हाला सर्व ज्ञाती बांधव यांनी मदत केली , धान्यापासून ते कपड्यापर्यंत साधने पुरवली , तीच जान ठेऊन आम्ही आज आमच्या गावात आनंदाने जीवन जगत आहोत . आजचा क्षण म्हणजे दुग्ध शरकरा योग आहे हनुमान जयंती त्याच दिवशी अमृतमय पाण्याचा लोकार्पण सो हळा हे आमचे भाग्य आहे . असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन खोपरे यांनी केले 


आमच्या डोक्यावरचा हंडा आज सर्वांच्या आशिर्वादाने व सहकार्याने उतरला आहे . आम्ही गेली अनेक वर्ष पाण्यासाठी वनवन फिरलो परंतू आमच्या व्यथा कोणीच ऐकण्यास तयार नव्हता परंतू ईश्वर कृपेने सर्व ग्रामस्थ , महिला मंडळ यांनी एक निश्चय करून आज आम्ही देखल्या डोळा आमच्याच श्रमातून पूर्णकलेली नळ योजना पाहू शकलो हेच आमचें भाग्य आहे आज आम्ही धन्य झालो पाणी आमच्या घरात आले.
- सौ . सरस्वती कापडी महिला अध्यक्षा ग्रामीण 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा