मिठु आंधळे शिवगौरव पुरस्काराने सन्मानीत : मरणोत्तर नेत्रदानाचा केला संकल्प
बोर्ली पंचतन, प्रतिनिधी
समाजातील सर्वसामान्यांसाठी नियमितपणे सामाजिक कार्य करणारे आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणे लागतोय या उदार भावनेतून सामाजिक कार्य करणारे समाजसेवक मिडू त्रिंबक आंधळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना यावर्षीचा सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल बीड जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ फाऊंडेशन जातेगाव यांच्यावतीने शिवगौरव या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे . या पुरस्कारचे वितरण प्रसिद्ध शिवव्याख्याते ज्ञानेश्वर राक्षे पाटील तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर , सामाजिक कार्यकर्ता तथा राजमाता जिजाऊ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ चव्हाण , लहराव मिसाळ आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . मिठू आंधळे हे सध्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या ठिकाणी एस . टी . मध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत . आजपर्यंत त्यांनी बीड , अहमदनगर , रायगड , औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातील तब्बल ४० अनाथ तसेच गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेतले आहेत . तसेच त्यांनी रक्तदान २५ वेळेस तर मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केलेला आहे . आंधळे हे नियमितपणे विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात . विविध जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा , विविध प्रकारच्या परिक्षा यांचे आयोजन करत असतात . त्यांना यापूर्वी शिक्षणसेवा गौरव , रायगड विभागाचा आदर्श सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात | आले आहे नुकतेच त्यांनी प्रवासात भेटलेल्या उसड कामगारांच्या शिक्षणापासून वंचित दोन मुलींना शालेय साहित्य देऊन शाळेत दाखल केले आहे . पुरस्काराबद्दल रायगड विभागाचे विभागीय नियंत्रक विजय गिते , श्रीवर्धन आगाराच्या आगार प्रमुख रेश्मा गाडेकर , सुजाता करंबेळकर , मानिक टेंगले , उदय हाटे , श्री पवार गेवराई आगाराचे प्रमुख संदीप साळुखे , विजयकुमार डोंगरे , प्राध्यापक ए . आर . मुंढे , . एम राठोड , जिल्हा परिषद शाळेचे आर . मुख्याध्यापक जाधव , डॉ . कानिफनाथ सारूक गणेश सारुक आदींनी त्यांचे अभिनंदन केले .

Post a Comment