आंबेत येथील सावित्री खाडीत वाळू खरडविणारे ड्रेझर्स आंबेत ब्रिजला करतायेत कमकुवत...प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष!
म्हसळा : निकेश कोकचा
कोकण पट्ट्यातील वाळू उत्खनन साठी प्रसिद्ध असलेल्या आंबेत खाडी मध्ये सर्रासपणे बेकायदेशीररित्या ड्रेझर्सच्या सहायाने वाळू उपसा सुरु आहे. वाळू उपश्याकडे प्रशासना कडुन दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे आंबेत ब्रिज कमकुवत होत चालला असून परिसरातील नागरीक याबाबत आपले रोष व्यक्त करित आहेत. रत्नागिरी -रायगड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेली सावित्री खाडी, महाड,म्हसळा आणि मंडणगड या तीन तालुक्याच्या हद्दीत होत असलेली हि ड्रेझर्स द्वारे अमाप वाळू उपसा सावित्री खाडीचे पात्र अव्वाच्या सव्वा फूट खोल खरडवत असून आगामी काळात येणाऱ्या महापुरांना हे वाळू उपसा कारणीभूत ठरणार असल्याचं वक्तव्य येथील नागरिकांकडून केलं जातंय.
या खाडीत गेल्या काही दोन महिन्यांपासून सेक्शन पंपाद्वारे होत असलेली अवैध वाळू उपसा स्थगित करून या खाडीत तीन ड्रेझर्सना ७ हजार ७७४ ब्रासची परवानगी वाळू उत्खननासाठी देण्यात आलेली असून दिवसाकाठी ७० ते ७७ ब्रास वाळू काढण्याची परवानगी यांना दिली असून सद्यस्थितीत हे ड्रेझर्स दिलेल्या प्रमाणाच्या बाहेर वाळू उपसा अजूनही या सावित्री खाडीत करत आहेत, त्यामुळे या होत असलेल्या बेसुमार वाळू उपसा मध्ये आंबेत येथील रायगड रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा ब्रिज असलेल्या म्हाप्रळ पुलाला या बार्जेस घासून जात असल्याने या पुलाला धोका निर्माण होत आहे त्यामुळे काही पिल्लरणा तडे सुद्धा या बार्जेस घासुन गेल्यामुळे गेलेले आहेत ,त्यामुळे या ड्रेझर्स चालकांना कायद्याची किंवा प्रशासनाची कोणतीही भीती राहिली नसल्याने मागील वर्षी महाड नजीक याच खाडीवरील कोसळलेल्या पुलासारखी या पुलाची अवस्था होऊ नये म्हणजे झालं.
तसेच सदर सावित्री खाडीत सुरु असलेली अवैध ड्रेझर्स द्वारे वाळू उत्खनन या वाळू सप्लायर्स करणाऱ्या मोठ्मोठाल्या बार्जेस यावर असणारे कर्मचारी असुशिक्षित असून त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिलेले नसून या बार्जेस वर कोणत्याही प्रकारचे दिवे ,सिग्नल्स,दिशा दर्शक यंत्रे अपघातकालीन साहित्य असली कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने एखाद्या अपघाताला रात्रीच्या वेळेत एखाद्या समोरील येणाऱ्या छोट्या जहाजांना धडक दिल्याने कदाचित हे प्रकार कारणीभूत सुद्धा ठरू शकतात, त्यामुळे अशा या डोळेझाक चाललेल्या वाळू व्यवसायावर शासनाचं काहीच का चालत नाही कि या शासनाला वाळूमाफियानी तुपाशी ठेऊन जनतेला उपाशी ठेवण्याचं काम हाती घेतलेलं आहे असा सवाल आता आंबेत परिसरात उठू लागलेला आहे.
..........................."............".........................
गेल्या वर्षी अशाच एका बार्जेसने आंबेत येथील सावित्री खाडीवर असलेल्या पुलाला धडक दिल्याने त्याची खालची बाजू कमकुवत झाली होती त्यानंतर मात्र या पुलाची वरच्या कठड्यांची डागडुजी करण्यात आली खरी परंतु मुळात कमकुवत झालेल्या खांब्यांना मात्र त्याच अवस्थेत ठेवल्याने त्यांची अवस्था आता झुळत्या झोपल्यासारखी झालेली पाहायला मिळत आहे
- संदिप डोंगरे, युवा सेना संपर्क अधिकारी, म्हसळा तालुका
..........................."............".........................
आंबेत खाडीत वारंवार दिवस रात्र होत असलेल्या वाळू उत्खननमुळे सावित्री नदीच्या पात्रा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात खोली निर्माण झाल्याने सावित्रीचा पाणी आता आंबेत परिसरातील कडधान्य लागवडीच्या शेतात घुसू लागल्याने आगामी काळात शेतकरी वर्गावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
- शेखर सावंत, मनसे संपर्क अधिकारी, म्हसळा -श्रीवर्धन

Post a Comment