मच्छिमार्केट जागेसाठी करदमे कुटुंबीयांचे आमरण उपोषण उपोषणाला शिवसेनेचा जाहीर पाठींबा- बाबुराव चोरगे

मच्छिमार्केट जागेसाठी करदमे कुटुंबीयांचे आमरण उपोषण
उपोषणाला शिवसेनेचा जाहीर पाठींबा- बाबुराव चोरगे 

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

महाराष्ट्र मस्त्यउद्योग यांचे मार्फत, नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड हैदराबाद यांचेकडून मंजूर अनुदानामधून श्रीवर्धन नगर परिषदेचे  मच्छिमार्केटच्या बांधकाम करण्याचा उदघाटन सोहळा तत्कालीन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते २५/११/२०१३ रोजी संपन्न झाला होता. तेव्हापासून मच्छिमार्केटच्या जागेचा वाद सुरु असून याबाबत नगरपालिका आद्यप निर्णय घेत नाही. म्हणून जागा मालक करदमे कुटुंबीय नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.या आमरण उपोषणास शिवशेना संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.

मच्छिमार्केटच्या जागेचे मूळ शेतकरी मालक करदमे कुटुंबीय याना कोणताही मोबदला न देता मच्छिमार्केटची जागा नगरपरिषदेने आपल्या नावावर केल्याचा आरोप करदमे कुटुंबियांकडून केला जात आहे. याबाबत करदमे कुटुंबीयांनी मंत्रालयीन लोकशाही दिनामध्ये दाद मागितली आसता मा मुख्यमंत्री महोदय यांनी श्रीवर्धन नगरपरिषदेस प्रश्नधिन जमीन बांधा, वापरा व हस्तांतर करणे. प्रश्नाधिन जमिनीचे हस्तांतरणिय विकास हक्क देणे. जमिनीस नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे व चालू बाजार भावाप्रमाणे मोबदला अदा करणे. व मोबदला अदा करणे शक्य नसल्यास प्रश्नाधिन जमीन मूळ मालकास परत करणे, असे चार पर्याय दिले आहेत. व चार पर्यायापैकी एक पर्याय निवडून यावर एका महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दिले होते. मात्र नगरपरिषदेने मा. मुख्यमंत्री यांनी लोकशाही दिनामध्ये दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे मुदस्सीर व मजीद करदमे व त्यांचे प्रतिनिधी दानिश लांबे व करदमे कुटुंबीय नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. 

मात्र नगर परिषदेने मच्छिमार्केटच्या जागेचा खटला न्याय प्रविष्ट आसल्यामुले निर्णय न घेतल्याचे म्हटले आहे.या उपोषणाला वेगवेळ्या संघटना  पाठिंबा दर्शवत असुन या मध्ये आता शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख शामकांत भोकरे,उप सभापती बाबुराव चोरगे,माजी सभापती तथा उप तालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर,शहर प्रमुख पिंट्या आणि संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातील सर्व शिवसेना संघटना या उपोषणास बसलेल्या करदमे कुटुंबीयाना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे माहिती उप सभापती बाबुराव चोरगे यांनी पत्रकारांना दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा