'स्त्री जन्म अभिमानास्पद आहे' अदिती तटकरे यांचे " माझे गाव माझी शाळा "उपक्रमात प्रतिपादन...

स्त्री जन्म अभिमानास्पद आहे

अदिती तटकरे यांचे " माझे गाव माझी शाळा "उपक्रमात प्रतिपादन

श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते


आधुनिक स्त्री पुरुषांच्या बरोबरीने  खांद्याला खांदा लावून यश संपादन करत आहे. पुरुषसत्ताक संस्कृती मध्ये स्त्री ने स्वतःस सन्मानाची जागा निर्माण केली आहे .मी स्त्री असल्याचा मला अभिमान वाटतो. असे कु. अदिती तटकरे जिल्हा परिषद अध्यक्ष रायगड यांनी  अभिनव भारत  संघ  व ज्ञानदान क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या माझे गाव माझी शाळा या  उपक्रमात प्रतिपादन केले.
          श्रीवर्धन मधील एस एन डी टी महाविद्यलयात आयोजित व्याख्यानात अदिती तटकरे यांनी विविध स्त्री प्रश्नास चालना देत विद्यर्थिनीशी मुक्त पणे संवाद साधला. स्त्री ने स्वतःचा सन्मान स्वतः करणे गरजेचे आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्याला  दिलेले स्वातंत्र्य फार मोलाचे आहे.त्याचा जीवनाची पाया भरणी करण्यासाठी उपयोग करा. आज तुमचा शांततेचा काळ आहे. तुमची आई तुमच्या रूपाने तिची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करत आहे याचे सदैव भान ठेवा .एकटी मुलगी संधी नाही तर जबाबदारी आहे. आज सर्वत्र स्त्री शक्तीचा जागर घडत आहे. स्त्री पुरुषाच्या तुलनेत सदैव कणखर व मानसिक दृष्टया सक्षम असल्याचे इतिहासा तुन दृष्टीस पडते. संसाराचा गाडा हाकत मुलांवर चांगले संस्कार प्रत्येक घरात आई च करते .सात च्या आत घरात ही बाब फक्त मुलींनाच का लागू ? सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे .लोकशाही मध्ये सर्वांना समान हक्क  राज्यघटनेने प्रधान केले आहे .विविध कायदे आज स्त्री च्या बाजूने लढण्यास उभे आहेत. परंतु पुरुषाच्या मनाने मात्र स्त्री ला आद्यप समानता दिलेली नाही .ती समानता जेव्हा प्राप्त होईल तेव्हा खऱ्या अर्थाने ताराबाई   शिंदे  यांना अभिप्रेत    स्त्री पुरुष समानता सत्यात उतरेल .व तो स्त्री जातीचा विजय असेल .इतिहासात अनेक वर्षे स्त्रियांनी अत्याचार सहन केले .   रामायणातील  सीतेपासून। महाभारतातील द्रौपदी पर्यंत आणि विल्सन मंडेला च्या विनी मंडेला पासून व्हर्जिना उल्फ पर्यंत अन्यायाच्या कथा  पाना पानावर लिहल्या आहेत .
         आधुनिक स्त्री सक्षम बनली आहे. ती अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहे. भावी काळात सर्वत्र स्त्री शक्तीचा आवाज कानी पडो हीच अपेक्षा आहे . माझे गाव माझी शाळा या उपक्रमा मुळे तुमच्याशी संवाद साधता आला या स्तुत्य उपक्रमास मी शुभेच्छा देते .असे कु अदिती तटकरे यांनी कार्यक्रम प्रसंगी म्हटले. सदर कार्यक्रमास श्रीवर्धन चे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने उपनगराध्यक्ष जितेंद्र  सातनाक, प्राध्यापक अनिल वाणी,   दर्शन विचारे, ऋतुजा भोसले,प्रगती आदवडे, अक्षता अविनाश कोळंबेकर,अभिनव चे सचिव शैलेश ठाकूर, प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रसाद नाझरे व फार मोठया संख्येने विदयार्थीनी उपस्थित होत्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी गुरव हिने केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा